सत्तेत न आल्यामुळे विरोधकांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी – अजित पवार


पुणे- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप  करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सीताराम कुंटे यांनी विस्तृतपणे दिला आहे. आम्हाला सर्व गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय उत्तर देता येत नाही. कुंटे यांच्या आहवालातून सर्व वस्तुस्थिती समोर आली आहे. कुठल्याही गुन्ह्यात कोणाला पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले. दरम्यान,  कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही असे सांगत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत जबाबदार पदावर असलेल्यांनी  किमान तारतम्य बाळगावे असी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.   मागच्या निवडणुकीत सत्तेत न आल्याने विरोधकांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

अधिक वाचा  #Attack on Nikhil Wagle: पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर भाजपा कार्यकर्त्यांचा हल्ला : महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विधान भवनात पुणे जिल्ह्यातील कोरोन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीबद्दल पवार यांना विचारले असता, ते म्हणाले,  महाराष्ट्रात तशी काही परिस्थिती नाही. विरोधक निरनिराळे मुद्दे घेऊन ही मागणी करत आहे. त्यांच्या मनात काय आहे हे समजत नाही. प्रशासन काम करते आहे. ज्या काही घटना राज्यात घडल्या आहेत त्याच तपास सुरु आहे. वाझे प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. आता तो तपास एनआयएकडे गेला आहे असे ते म्हणाले.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप  करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

अधिक वाचा  शेवटी कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहे - का म्हणाले असे चंद्रकांत पाटील?

सीताराम कुंटे यांनी या अहवालात म्हटलं आहे, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्यात येत आहे.”

कुंटे यांच्याबाबत बोलताना पवार म्हणाले, सीताराम कुंटे हे चांगले अधिकारी आहेत. त्यांच्या मेरीटवर ते मुख्य सचिव पदापर्यंत पोहचले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जो अहवाल दिला आहे तो वाचला तर काय झालं, काय घडलं हे लक्षात येईल. अधिकाऱ्यांच्या नेमणुका या, यासंदर्भात नेमलेल्या कमिटीनेच केल्या असल्याची वस्तुस्थिती समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या मताला पाठींबा

अधिकार्यांना ओळखण्यात कमी पडलो अशी कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, आम्ही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करतो. त्यामुळे राज्याचे प्रमुख जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलतात तेव्हा त्यावर पुन्हा आमचे वेगळे मत नोंदवणे योग्य नसते. त्यामुळे त्यांचे जे मत आहे त्याला माझा पाठींबा आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love