#Pune Public Policy Festival: बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य या संदर्भातील डेटावर काम करण्याची गरज : राहुल बजोरिया

Need to work on data on unemployment, education and health
Need to work on data on unemployment, education and health

Pune Public Policy Festival | PPPF:  बेरोजगारी(Unemployment), शिक्षण(Education) आणि आरोग्य(Health) या विषयांवर काम करायचे असेल तर आपल्याकडे त्या संदर्भात डेटा(Data) उपलब्ध नाही. या डेटावर काम करण्याची आज गरज आहे. सगळ्या गोष्टी दिल्लीवरून होतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे मत ‘बार्कलेज’(Barclays’)या बहुराष्ट्रीय युनिव्हर्सल बँकेचे ( Multinational Universal Bank ) व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आणि देशातील एक प्रमुख अर्थतज्ज्ञ राहुल बजोरिया(Economist Rahul Bajoria) यांनी व्यक्त केले.(Need to work on data on unemployment, education and health)

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या(Gokhale Institute of Political Science and Economics )काळे सभागृहात पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल(Pune Public Policy Festival) अर्थात पीपीपीएफ(PPPF) अंतर्गत आयोजित ‘रिथिंकिंग- ग्रोथ अँड इक्वॅलिटी’( ‘Rethinking- Growth and Equality’ )या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. यामध्ये बार्कलेज या बहुराष्ट्रीय युनिव्हर्सल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि देशातील एक प्रमुख अर्थतज्ज्ञ राहुल बजोरिया व नवम कॅपिटलचे(Navam Capital) व्यवस्थापकीय संचालक(Managing Director) राजीव मंत्री(Rajiv Mantri) यांच्याशी इंडिकस फाउंडेशनच्या( Indicus Foundation)मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुमिता काळे(Sumita Kale) यांनी संवाद साधला.

अधिक वाचा  सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता सहावी 'युवा संसद' पुण्यात : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुुणे तर्फे आयोजन

बजोरिया म्हणाले, बेरोजगारी या विषयावर काम करायचे असेल तर आज आपल्याकडे त्या संदर्भात डेटा उपलब्ध नाही. या डेटावर काम करण्याची आज गरज आहे. सगळ्या गोष्टी दिल्ली वरून होतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर देखील याच पद्धतीने काम होणे गरजेचे आहे याकडे बजोरिया यांनी लक्ष वेधले.

धोरणांची अंमलबजावणी होत असताना राजकीय हस्तक्षेपाचा अडसर

आपल्याकडे अनेक धोरणे आहेत मात्र त्यांची अंमलबजावणी होत असताना राजकीय हस्तक्षेपाचा अडसर हा मुद्दा कायम येत राहतो. या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे धोरणे ठरविण्याची आणि त्यांवर योग्य अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मंत्री यांनी यावेळी  नमूद केले. 

भारताच्या क्षमता आजवर अवहेराल्या गेल्या आहेत. मात्र आपल्याकडे विकासात्मक संशोधनावर भर दिला गेला पाहिजे. भारतातील तरुणांकडे असलेले तांत्रिक ज्ञान वापरून आपण अनेक उदाहरणे उभी करू शकतो. यामुळे नजीकच्या भविष्यात अनेकविध क्षेत्रातील समस्यांवर विकासात्मक दृष्टीने पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत असेही ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love