#Pune Public Policy Festival:धोरणनिर्मिती प्रक्रीयेमध्ये सरकारने माध्यमांशी फारकत घेतली असल्याचे प्रकर्षाने जाणवते

Media and Social Policies
Media and Social Policies

Pune Public Policy Festival | PPPF: ज्या लोकांसाठी धोरणे(Policy) राबविले जाणार आहे त्यांचे मत ध्यानात न घेता आपल्याकडे सरकारी पातळीवर(government level) धोरणे बनविण्याची परंपरा आहे. जेव्हा या धोरणांना जनतेमधून विरोध होतो तेव्हा मात्र माध्यमांमुळे(media) धोरणे योग्य पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविली जात नाहीत अशी ओरड होते. अशा वेळी धोरणनिर्मिती(Policy making) प्रक्रीयेमध्ये सरकारने(Government) माध्यमांशी(medi) फारकत घेतली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. शिवाय प्रादेशिक भाषांमध्ये धोरणात्मक चर्चा तितक्याशा प्रमाणात होत नसल्याने माध्यमांनाही मर्यादा येतात, असे स्पष्ट मत माध्यम प्रतिनिधी व तज्ज्ञांनी व्यक्त केले.(In the policy-making process, the government parted ways with the media)

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या(Gokhale Institute of Political Science and Economics) काळे सभागृहात  पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल(Pune Public Policy Festival) अर्थात पीपीपीएफ(PPPF) अंतर्गत आयोजित ‘माध्यमे आणि सामाजिक धोरणे’(Media and Social Policies) या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात सकाळ माध्यम समूहाचे ( Sakal Media Group) संपादक सम्राट फडणीस(Samrat Phadnis), सीएनएन न्यूज १८ (CNN News 18) च्या मुंबईच्या प्रमुख विनया देशपांडे(Vinaya Deshpande), राजकीय विश्लेषक(Political Analyst) अभिराम घड्याल पाटील(Abhiram Ghadyal patil) सहभागी झाले होते. थिंक बँक लाईव्हचे(Think Bank Live) मुख्य संपादक(Chief Editor) विनायक पाचलग(Vinayak Pachalg) यांनी यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.

अधिक वाचा  भारत - फ्रांस दरम्यानचा सहाव्या संयुक्त लष्करी सराव ' शक्ती - 2021' ची फ्रांस येथे सांगता

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे(Ajit Ranade) , महोत्सवाचे संयोजक इंद्रनील चितळे(Indranil Chitale) या वेळी उपस्थित होते. सदर महोत्सवाचे आयोजन डॉ साहिल देव यांच्या पुढाकाराने व परिमल आणि प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या मदतीने करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना सम्राट फडणीस म्हणाले, “आपल्याकडे राष्ट्रीय धोरण बनविण्याची, त्यांवर चर्चा व उहापोह होण्याची भाषा ही प्रामुख्याने इंग्रजी आहे. त्यामुळे जेव्हा माध्यमांचा विषय या संदर्भात येतो तेव्हा प्रादेशिक भाषांमध्ये त्यांवर सखोल चर्चा- लिखाण होत नाही. प्रादेशिक भाषा वगळता इंग्रजी भाषेत मात्र ही चर्चा मोठ्या प्रमाणात घडत असलेली आपल्याला पहायला मिळते.”

माध्यमांच्या प्रकारावर देखील धोरणांसंबंधी माध्यमांची काय बाजू असेल हे ठरते, असे सांगत विनया देशपांडे म्हणाल्या, “टीव्ही माध्यमांमध्ये व्हिज्युअल असेल तर त्या स्टोरीला कव्हरेज मिळते. दृश्यांची मदत स्टोरी किंवा धोरणांच्या वार्तांकनात महत्त्वाची ठरते. मात्र, असे असले तरी एखादा प्रश्न जास्तीत जास्त दोन दिवस टीव्ही माध्यमांवर दाखविला जाऊ शकतो, ही टीव्ही या माध्यमाची मर्यादा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. या उलट प्रिंट माध्यमांमध्ये आणखी काही दिवस ही स्टोरी राहू शकते.”

अधिक वाचा  मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार- मुरलीधर मोहोळ

टीव्ही माध्यमांचा परिणाम जबरदस्त असला तरी त्यामागे तशी जबरदस्त व्हिज्युअल मिळवणे यावर तो परिमाण अवलंबून असतो. आज प्रत्येक टीव्ही चॅनेलकडे ट्रेंडिंगडेस्क असतो आणि प्रेक्षक ज्या बातम्या जास्त बघतात त्या त्यांना दाखवाव्या लागतात. म्हणून अनेकदा धोरण निर्मिती सारख्या बातम्या कमी प्रेक्षक बघतील म्हणून दाखवायच्याच नाहीत का असा प्रश्न आम्हीही उपस्थित करतो, असेही देशपांडे यांनी नमूद केले. 

आज कोणत्याही सरकारला माध्यमांची गरज नाही, हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे, मात्र गेल्या काही वर्षांत माध्यमांचे स्वरूपही बदलले असल्याने डिजिटल आणि सामाजिक माध्यमे उत्तम व्यासपीठ म्हणून पुढे येत आहे याकडे अभिराम घड्यालपाटील यांनी लक्ष वेधले.

आज प्रादेशिक आणि इंग्रजी अशी दोन्ही माध्यमे धोरणात्मक विषयावर चर्चा करतात असे मला वाटत नाही. राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक बदल घडवून आणण्यास धाडस लागते, आपली माध्यमे ते दाखवत नाहीत आणि अशा आलेल्या संधींचा देखील ते फायदा घेत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

अधिक वाचा  वॉल्टर्स क्लुवर तर्फे पुण्यात इनोव्हेशन हब : अद्ययावत सुविधेसह जागतिक तंत्रज्ञान कंपनीचा भारतात विस्तार

माध्यमांनी सक्रीयपणे धोरण निर्मितीत सहभाग घ्यायला हवा, असे सांगत सम्राट फडणीस म्हणाले, “आज डिजिटल माध्यमांचा आवाका वाढत असला तरी रेव्हेन्यू मिळण्याइतका त्याचा विस्तार झालेला नाही. सध्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत विषय पोहोचविणे हेच मुख्यत्वे डिजिटल माध्यमांचे लक्ष असायला हवे. जनतेने प्रिंट प्रमाणे डिजिटल मिडीयाला गांभीर्याने घ्यावे असे दिवस यायला अद्याप वेळ आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love