Understanding the application of policies to society and the country is more important than an academic degree

#Pune Public Policy Festival : शैक्षणिक पदवीपेक्षा धोरणांचा समाजाला आणि देशाला होणारा उपयोग समजून घेणे जास्त महत्त्वाचे

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

Pune Public Policy Festival | PPPF : धोरणात्मक पातळीवर काम करीत असताना शैक्षणिक पदवीपेक्षा (Academic degree) धोरणांचा (Policy) समाजाला (Society) आणि पर्यायाने देशाला(Country) होणारा उपयोग समजून घेणे व त्याप्रकारे काम करणे हे जास्त महत्त्वाचे असल्याचे मत जर्मनीमधील (Germany) हर्टी स्कूल(Herty School)मध्ये सार्वजनिक व्यवस्थापन( Public Management)आणि राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक( Professor of Political Economy)डॉ. मार्क हॅलरबर्ग (Dr. Mark Hallerberg) यांनी मांडले. (Understanding the application of policies to society and the country is more important than an academic degree)

बीएमसीसी रस्त्यावरील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या(Gokhale Institute of Political Science and Economics) काळे सभागृहात  पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल( Pune Public Policy Festival ) अर्थात पीपीपीएफ(PPPF) अंतर्गत आयोजित  ‘सार्वजनिक धोरण शिकण्यासंदर्भात विकसित होत असलेले पर्याय’(Evolving Options for Learning Public Policy’) या विषयावर परिसंवादामध्ये ते बोलत होते. या परिसंवादात जर्मनीमधील हर्टी स्कूलमध्ये( (Herty School)सार्वजनिक व्यवस्थापन(( Public Management)) आणि राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक( Professor of Political Economy) असलेले डॉ. मार्क हॅलरबर्ग ( (Dr. Mark Hallerberg),व्हॅल्यू फॉर गुड संस्थेच्या संस्थापिका(Founder of Value for Good Institute) आणि व्यवस्थापकीय संचालिका क्लारा पेरॉन(Clara Perron)यांनी मार्गदर्शन केले. फ्लेम विद्यापीठाचे ( Flame University) असोसिएट प्रोफेसर डॉ. युगांक गोयल(Associate Professor Dr. Yugank Goyal) त्यांच्याशी संवाद साधला.

गेल्या काही वर्षांमध्ये भारत धोरणात्मक दृष्टीने परिपक्व झाला असून या संदर्भातील अभ्यासक्रमांकडे तरुणाईचा ओढा असलेला आपल्याला पहायला मिळत आहे असे मत क्लारा पेरॉन यांनी यावेळी व्यक्त केले. युरोप, अमेरिकेचा विचार केल्यास धोरणात्मक पातळीवर भारताची कामगिरी सुधारत आहे असेही त्या  म्हणाल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *