पुणे – शिवसेनेचे बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहरातील विविध भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी आक्रमक शिवसैनिकांनी हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले. हि रॅली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
या रॅलीला समीर तुपे, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, महिला शहर प्रमुख संगिता ठोसर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, हडपसर उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर यावेळी उपस्थित होते. हडपसर भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाच रुग्ण वाहिकेमधून ही अंत्ययात्रा काढत प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बंडखोर आमदारांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले. शिवसेना ही कार्यकर्ते,नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. हे सर्व बंडखोर आमदारांनी लक्षात ठेवाव. आम्ही सर्व शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्या सोबत असणार असल्याची ग्वाही यावेळी शिवसैनिकांनी दिली.
विजय देशमुख म्हणाले, ज्या आमदारांना उद्धव ठाकरे साहेबांना संभाळले. त्या उद्धव ठाकरे साहेबांना आमदारांनी धोका दिला. हे अतिशय दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे हे फक्त शिवसैनिकांचा विचार करत असतात. या आमदारांपैकी काही आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद दिले आहेत. मंत्री पद देताना ठाकरेंनी आमदार मला धोका देतील असा कुठलाही विचार केला नव्हता. हे आमदार ज्यादिवशी महाराष्ट्रातील त्या दिवशी आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.