पुणे-पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या झालेल्या या जागेसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके (नाना) यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून समाधान आवताडे हे उमेदवार होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. रविवारी या पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे हे 3733 मतांनी विजयी झाले. या निकालानावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त करताना ,”सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली, भारत नाना माफ करा. नाना तुमच्या प्रामाणिक सेवेला पैशाने हरवले.” असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजली होती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचारामध्ये बोलताना, “हे सरकार कधीपर्यंत टिकवायचे हे माझ्यावर सोडा”, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडणं हे येड्या गबाळ्याचे काम नाही असा टोला लगावला होता.
अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली या पराभाव बद्दल राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत, “भारत नाना आम्हाला माफ करा तुम्ही केलेली सेवा आम्हाला पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनी पॉवर याचा वापर करून भाजपने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली, नाना तुमच्या प्रामाणिकतेला पैशाने हरविले”, असे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.