५० कोटीची वसुली सहजरीत्या होऊ शकते, हाच वाझे यांना पुन्हा रुजू करून घेण्यामागे उद्धव ठाकरे यांचा उद्देश – किरीट सोमय्या

राजकारण
Spread the love

पुणे-कोरोनाच्या काळात मातोश्री मधून एकदाही बाहेर न पडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावरील अधिकाऱ्यासाठी अजय मेहता यांच्या यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल स्विकारून एपीआय सचिन वाझे यांना ताबडतोब परत रुजू करून घेण्याच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सही केली. उद्धव ठाकरे यांना एक वसुली करणारा माणूस हवा होता. वाझे हा त्यांच्या विश्वासातील जुना शिवसैनिक आहे. त्याच्या माध्यमातून ५० कोटीची वसुली सहजरीत्या होऊ शकते हाच उद्देश वाझे यांना पुन्हा तात्काळ कमावर रुजू करून घेण्यामागे आहे असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.

किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयातील लसीकरण केंद्रांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सचिन वाझे अनेक कंपन्यांशी आर्थिक व्यवहार आहेत त्यांची नावे मी कालच प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये अनेक शिवसैनिकांची भागीदारी आहे. स्पेशल कामासाठी सचिन वाझे याचा उपयोग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करायचे आणि त्यामुळे सरकारमध्ये माफियागिरी करणे आणि पैसे कमावणे हा एकमेव धंदा होता आणि त्यासाठी सचिन वाझे हा चांगला माणूस होता असा आरोप सोमय्या यांनी केला. सचिन वाझे यांना पुन्हा का रुजू करून घेतले याचा जाब उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी द्यावा आणि रुजू करून घेण्याची प्रक्रिया लोकांसमोर ठेवावी अशी मागणीही सोमय्या यांनी केली.

मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा

दर्जाचा पोलीस अधिकारी क्राईम ब्रँचची गाडी घेऊन फिरतो. त्यामुळे वाझे हा त्यांचा विशेष माणूस होता हे सिद्ध होते. हे सरकार माफियागिरी करत असून या सर्व घटनेला जबाबदार असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी करावी. एनआयएने त्यांची नियुक्ती कशी व केव्हा झाली तसेच ती कशासाठी झाली याचाही तपास करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *