पुणे – ३४ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत सौ. वेदंगी तिळगुळकर या मिसेस पुणे फेस्टिव्हल ठरल्या . डॉ ऐश्वर्या जाधव व सपना हत्तरकी या दोघी रनरअप ठरल्या .मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य ,व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा यशवंतराव चव्हाण येथे पार पडली
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे फेस्टीवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या प्रसंगी माजी आमदार मेधा कुलकर्णी ,संयोजिका अमृता जगधने ,आशुतोष जगधने ,अर्चना सोनावणे ,रवींद्र दुर्वे ,सुप्रिया ताम्हाणे आणि निलेश धर्मिष्ठ्ये हे उपस्थित होते . .या प्रसंगी कलाकृतीच्या संचालिका अदिती केळकर यांनी गणेश वंदना सादर केली
या स्पर्धेत १५० हून अधिक विवाहित महिला सहभागी झाल्या होत्या. त्यातील १० महिलांची अतिम फेरी साठी निवड करण्यात आली .
या अंतिम फेरीत ३ प्रकारे स्पर्धा घेतली गेली. पहिल्या फेरीत स्वपरिचय आणि पारंपारिक पोशाखात ,नौवार, घागरा ,सहावार ,आणि केरळी कर्नाटकी पेहेराव असा होता ,दुसर्या फेरीत नृत्ये व कलागुण सादरीकरण झाले . याला कॅज्युअल ड्रेस हा पेहराव होता . तिसर्या फेरीत ५ जणींची अतिम फेरीसाठी निवड झाली . त्यासाठी वेस्टर्न सिल्क गाऊन हा पेहेराव होता . त्या मधून प्रथम क्रमांक सौ वेदंगी तिळगुळकर आणि रनरअप साठी डॉ ऐश्वर्या जाधव व सौ सपना हत्तरकी यांना रनरअप म्हणून घोषित केले गेले.झी मराठीच्या कारभारी लय भारी फेम निखील चव्हाण यांच्या हस्ते मिसेस पुणे फेस्टिव्हल विजेतीला मुगुट चढविण्यात आला. पहिल्या रनर अप ला कारभारी लई भारी फेम राधिका पिसाळ व दुसर्या रनर अप ला पुणे फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख काका धर्मावत यांच्या हस्ते मुगुट बहाल केला गेला . परीक्षक म्हणून रचना खानेकर ,ओमकार शिंदे आणि सारिका शेठ यांनी काम पहिले. मेकप प्राची मराठे आणि श्रद्धा चव्हाण यांनी केले होते.
या प्रसंगी ओम डान्स अकादमी यांनी संगीत व नृत्ये सादर केली . या वेळी निवेदन अंजली अत्रे यांनी केले.या कार्यक्रमाचे संयोजन अमृता जगधने यांनी केले असून आशुतोष जगधने आणि अर्चना सोनावणे हे सह संयोजक होते. या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती .