३४ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये महिलांची नृत्य स्पर्धा संपन्न : महिलांचे अप्रतिम सादरीकरण

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -फ्युजन बॉलीवूड, कथक, कुचीपुडी, कथकली, भरतनाट्यम् अशा विविध नृत्य प्रकारांचा आविष्कार, २० वर्षापासून ते ५० वर्षे वयाच्या महिलांचा उत्साह आणि अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली.

३४ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि  प्रख्यात नृत्य विशारद आशिष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या नृत्य स्पर्धेच्या संयोजिका  संयोगिता कुदळे आणि दीपाली पांढरे हे उपस्थित होते.पुणे फेस्टिव्हल च्या उगवते तारे व इंद्रधनू या कार्यक्रमांस यंदा 25 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त  संयोजक रवींद्र दुर्वे यांचा सत्कार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आला .

या नृत्य स्पर्धेमध्ये २० ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्ष अशा २ वयोगटात ३ मिनिटाच्या एकल नृत्य स्पर्धा आणि २० ते ५० वर्ष वयोगटात किमान४ कमाल  १० महिला स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या ५ मिनिटांची समूह नृत्य स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या.

एकल आणि सामुहिक विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण करताना तरुणींनाही लाजवेल असा ३६ ते ५० वयोगटातील महिलांमधला उत्साह हा प्रेक्षकांची वाहवा मिळवत होता

समायरा मुवी फेम केतकी नारायण व डान्स इंडिया डान्स फेम मृण्मयी गोंधळेकर आणि कोरिओग्राफर गार्गी कारखानीस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे निवेदन रत्ना दहीवेलकर यांनी केले. बक्षिसांचे वितरण पुणे फेस्टीव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.

संयोगिता कुदळे आणि दीपाली पांढरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. सुजानील्स लायसील, कलाक्षेत्रम, डिवाईन लव्ह हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.

विजेत्यांची नावे

सामुहिक नृत्य गट

प्रथम क्रमांक-  ट्रोडो गृप

द्वितीय क्रमांक – नुपूर डान्स अकॅडमी

तृतीय क्रमांक –  द फँटॅस्टिक फोर

एकल लहान गट

प्रथम क्रमांक – स्नेहल साधू

द्वितीय क्रमांक – अंकिता शिवतरे

तृतीय क्रमांक – करिश्मा कोठारी

उत्तेजनार्थ  – मृणाली साखरे

एकल मोठा गट

प्रथम क्रमांक – सुप्रिया संत

द्वितीय क्रमांक – पल्लवी लोंढे

तृतीय क्रमांक – सुचिता पाटील

उत्तेजनार्थ -पूनम शिंदे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *