स्मरण पं. दीनदयाळांचे

पुणे-मुंबई लेख
Spread the love

तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडून हत्या झाली ! (११ फेब्रुवारी १९६८)

“भारत में रहनेवाला और इसके प्रति ममत्व की भावना रखने वाला मानव समूह एक जन हैं । उनकी जीवन प्रणाली ,कला , साहित्य , दर्शन सब भारतीय संस्कृति है । इसलिए भारतीय राष्ट्रवाद का आधार यह संस्कृति है । इस संस्कृतिमें निष्ठा रहे तभी भारत एकात्म रहेगा ।” ह्या आपल्या विचारातून पं. दीनदयाळजींनी देशाला ‘एकात्म मानववाद’ ही नवीन विचारधारा शिकवली.

बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या दीनदयाळजींनी कॉलेज शिक्षणानंतर संघाचा पूर्ण वेळ प्रचारक राहण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. १९५१ साली संघ प्रेरणेतून स्थापन झालेल्या ‘अखिल भारतीय जनसंघा’च्या संघटन मंत्रीपदी दीनदयाळजींची नियुक्ती करण्यात आली. पुढे १५ वर्षे पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडून, १९६७ साली कालिकत येथे झालेल्या जनसंघाच्या अधिवेशनात ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवडून आले.

त्यांचे वागणे, बोलणे, वावरणे इतके साधे आणि सहज होते की कोणालाही वाटत नसे की हे जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. स्वाभाविकच देशभर प्रवासात ते बरोबर कोणतीही सुरक्षा नाकारीत असत. आणि ह्याचाच गैरफायदा दीनदयाळजींच्या (पर्यायाने जनसंघाच्या) शत्रूंनी ‘त्या’ दिवशी घेतला. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी पंडितजी रेल्वेने प्रवास करीत असता, मुगलसराय रेल्वे स्टेशनजवळ कोणा अज्ञाताने त्यांची हत्या केली व मृतदेह स्टेशनच्या वॉर्डमध्ये ठेवला.

स्वतःचे आयुष्य निःस्वार्थपणे देशाला समर्पित केलेल्या पंडित दीनदयाळजींचा अंत असा दुर्दैवी झाला.

पं. दीनदयाळजींना विनम्र आदरांजली !

©️ प्रसन्न खरे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *