राज्यात मास्कची सक्ती नाही -राजेश टोपे


पुणे- राज्यातील काही शहरांमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मास्क (mask )वापरण्याविषयी अपील करण्यात आले आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. 

व्हीएसआयच्या वतीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, मागच्या काही दिवसांत मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगडच्या काही भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात मास्क बंधनकारक असल्याबाबत कोणताही उल्लेख नाही. तर मास्क वापरण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे, बस, कार्यालये अथवा जी गर्दीची ठिकाणी आहेत, तेथे मास्क प्राधान्याने वापरला जावा, अशी अपेक्षा आहे. याबाबत कोणताही गैरअर्थ काढला जाऊ नये. मास्कची कोणतीही सक्ती नाही. मात्र, नागरिकांना काळजी घ्यावी. आवश्यक ठिकाणी मास्क वापरावा. त्याचबरोबर कालावधी पूर्ण झाला असेल, तर बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

अधिक वाचा  सामाजिक कार्यकर्ते वसंतराव खरे यांचे दुःखद निधन

मागच्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्यामुंबईसह काही भागांत यात वाढ दिसून येते. पुढील 15 दिवस या परिस्थितीचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतरच यासंदर्भातील निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. 

बोगस डॉक्टरांना कोणताही दयामाया दाखविली जाणार नाही. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱयांना करण्यात आल्या असल्याचेही टोपे यांनी नमूद केले. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love