ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या अमय रासकरचे चार्ल्स कोरिया सुवर्ण पदक २०२२ पुरस्कारांमध्ये यश

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे – चार्ल्स कोरिया यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त चार्ल्स कोरिया फाऊंडेशनतर्फे  संपूर्ण भारतातील सर्वात असामान्य अंडरग्रॅज्युएट आर्किटेक्चर थिसिस वार्षिक पुरस्कारात पुण्यातील एसएमईएफ ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील अमय रासकर ह्या विद्यार्थ्यास पहिला सन्माननीय उल्लेखाचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले . आर्कि. निनाद रेवतकर यांनी त्याला मार्गदर्शन केले होते 

या वर्षी सन्माननीय आर्किटेक्ट ज्युरी कपिल गुप्ता (सेरी आर्किटेक्ट), रोहन शिवकुमार (आर्किटेक्ट, अर्बन डिजाईनर, चित्रपट निर्माते), मेघल आर्य (सह–संस्थापक, आर्य आर्किटेक्ट्स), सुहासिनी अय्यर (सह–संस्थापक, ऑरोविल सीएसआर ट्रस्ट) आणि आर्थर डफ (मेंटॉर व प्रिंसिपल आर्किटेक्ट, प्रॅक्सीस आर्किटेक्ट्स) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. ह्यांत त्यांनी मुख्यत्वे प्रस्तावित प्रकल्पाची जागा आणि संदर्भ यांचा विचार करून फॉर्मुलेशनमधील स्पष्टता आणि प्रत्यक्ष जीवनातील समस्यांची सोडवणूक यांचे परीक्षण केले.

 ‘एआय + एक्स पॅरॅडिगम रिसर्च सेंटर’ या शीर्षकाचा हा अभ्यासपूर्ण प्रस्ताव पर्यावरण संशोधन केंद्राकडून आला आहे. यात वापरकर्ते आणि शहरांसाठी गतिमान नागरी वातावरण निर्माण करताना संगणकीय बुद्धिमत्ता आणि बिल्डिंग डायग्नोस्टिक्स सॉफ्टवेअर यांना टूलच्या रूपात पुढे ठेवून पॅसिव्ह डिझाईनची नीती तयार करणे व त्यांचे मूल्यमापन करणे यांना स्थान देण्यात आले आहे. या प्रकल्पात प्रोग्राम्सच्या मौलिक आकारमानीय ग्रिडमध्ये काही प्रक्रियात्मक बदलांचा वापर केला आहे. दिवसा प्रकाश येण्यासाठी, थर्मल मास एफिशियन्सी व क्रॉस वेंटिलायझेशन तसेच संस्थात्मक कार्यकमांच्या कार्यक्षम आयोजनासाठी संगणकीय ऑप्टिमायझेशनच्या माध्यमातून ॲडीशन-सब्स्ट्रॅक्शन मॉड्यूलचे रॅशनलायझेशन करण्यात आले आहे. सार्वजनिक स्थानांवरील इमारतींच्या टायपोलॉजिकल पुनरावृत्तीमुळे मानवी वावरासहित हरित टेरेस आणि आकाशाच्या दिशेने मोकळ्या जागा यांच्यासह आश्चर्यकारक रीतीने इमारतींची निर्मिती होते. यामुळे कॅम्पसमध्ये दृश्यात्मक कनेक्टिव्हिटी यायला मदत होते.

एसएमईफ ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या  प्राचार्या डॉ. पूर्वा केसकर म्हणाल्या की अमयच्या डिझाईनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्रिय केलेल्या पारंपरिक हवामानास अनुकूल डिझाइनचा मिलाफ आहे. आपल्या देशी मूल्यांचा उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञानाचा हुशारीने वापर केला जाऊ शकतो यावर एसएमईफच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरचा विश्वास आहे. इथे विद्यार्थ्यांना आपल्या मातीत पाय घट्ट रोवून भविष्याकडे झेप घेण्यासाठी तयार केले जाते.”

चार्ल्स कोरिया सुवर्ण पदक या पुरस्काराची स्थापना भारतीय आर्किटेक्ट आणि नगररचनातज्ञ चार्ल्स कोरिया यांनी १९९८ मध्ये केली होती. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आपल्या पहिल्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमातील अंडरग्रॅज्युएट थिसिस प्रोजेक्टसाठी त्यांच्यातील गुणवत्ता आणि प्रतिभा यांसाठी हे पदक देण्यात येते. चार्ल्स कोरिया फाऊंडेशन (सीसीएफ) दरवर्षी हे सुवर्ण पदक प्रदान करते. सुरूवातीला हा पुरस्कार केवळ मुंबई व गोव्यातील आर्किटेक्चर महाविद्यालयांसाठी मर्यादित होते . मात्र २०२२ या वर्षीपासून सीसीएफने भारतातील सर्व महाविद्यालयांसाठी खुले करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *