‘काली’ चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिकलाई यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी : काय आहे प्रकरण? : कोण आहेत लीना मनिमेकलाई?

मनोरंजन राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली – ‘काली’ (kaali) चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai ) यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश अखेर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लीना मणिमेकलाई यांच्या अडचणी वाढू शकतात. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून लीनाच्या विरोधात लुकआउट परिपत्रक (lookout notice )जारी करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले होते.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भोपाळ पोलिसांनी लीनाविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर निर्मात्या लीना यांच्या विरोधात लुकआऊटर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. लुकआउट नोटीसशी संबंधित अर्ज केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता.

याआधी शिवराज सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते, ‘लीनाविरोधात लुकआउट सर्कुलर जारी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहून चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर (LOC) जारी करण्याची विनंती करणार आहोत. ती जे काही करत आहे, ते मुद्दाम करत आहे, असं वाटतं. त्याच्या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं मी ट्विटरला लिहीन, असेही म्हटले होते. ट्वीटरने लीना यांची पोस्ट काढून टाकली होती. याप्रकरणी शिवराज सरकारने सुरुवातीपासूनच लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. लीनाविरुद्ध मध्यप्रदेशात स्वतंत्र गुन्हेही दाखल आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वतः काली आईचा अपमान सहन केला जाणार नाही, असे सांगितले होते.

लुकआउट नोटीस म्हणजे काय

सामान्यत: लुकआउट नोटीस (lookout notice) हे एक प्रकारचे परिपत्रक आहे ज्याचे नाव एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात नाव असलेल्या व्यक्तीने देश सोडून पळून जाऊ नये याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जारी करतात. एलओसी जारी केली जाते जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एखाद्या विशिष्ट प्रकरणात फरार असते आणि ती व्यक्ती देश सोडून पळून जाण्याची भीती असते. इतर काही प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या देशाबाहेरच्या हालचालींवर निर्बंध घालण्यासाठी पोलीस त्याचा वापर करतात.

काय आहे प्रकरण?

माँ कालीवर वादग्रस्त चित्रपट बनवणाऱ्या चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई सध्या देशभरात चर्चेत आल्या आहेत. देशाच्या काही भागात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या ‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरुन अनेक लोक त्यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. पोस्टरमध्ये मां काली सिगारेट ओढताना दिसते आहे. तसेच तिच्या एका हातात त्रिशूल तर एका हातात एलजीबीटीक्यू समुदायाचा ध्वज दिसत आहे. हे पोस्टर समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहेत.

हे पोस्टर पाहिल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि ट्विटरवर #arrestleenamanimekalai ट्रेंड करण्यास सुरुवात केली. लीनाच्या या कृत्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप लोक करत आहेत. फिल्ममेकर लीला मनिमेकलाई कोण आहेत (Who Is Leena Manimekalai ) याबाबत आपण जाणून घेऊयात

लग्नाच्या मुद्द्यावर  घर सोडले होते

लीना मनिमेकलाई यांचे मदुराईमधील महाराजापुरम हे मूळ गांव आहे. लीना मनिमेकलाई यांचे त्याचे वडील कॉलेजमध्ये लेक्चरर होते. लीना यांना त्यांच्या लग्नाची योजना कळली तेव्हा लीना त्यांचे घर सोडून चेन्नईला आल्या. तिथे त्यांनी तामिळ मासिकात नोकरीसाठी अर्ज केला. मात्र, मासिकाच्या मालकांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. खूप मेहनतीनंतर त्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घरच्यांचे मन वळवण्यात यश आले. मात्र, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना वडिलांचे निधन झाले.

2002 मध्ये महात्मा या चित्रपटातून करिअरची सुरुवात

कुटुंबाच्या पाठिंब्याने लीनाने बंगळुरूमधील एका आयटी फर्ममध्ये काही वर्षे काम केले. 2002 मध्ये त्यांनी महात्मा (mahatma)या पहिल्या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून कधीच मागे वळून पाहिले नाही.

चित्रपटासाठी अनेकदा घराचे भाडेही देता येत नव्हते

लीना  यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेल्या कामासाठी अनेक फेलोशिप मिळवल्या. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र चित्रपट बनवण्यासाठी त्यांना अनेकदा पैशांसाठी संघर्ष करावा लागला. अनेकदा चित्रपटासाठी पैसे देताना त्यांना घराचे भाडे सुद्धा देणे शक्य होत नसे.

यापूर्वीही चित्रपटांवरून वाद निर्माण झाले होते

त्यांच्या 2002 मध्ये आलेल्या ‘महात्मा’ या चित्रपटात अल्पवयीन मुलींना मंदिरांच्या ताब्यात दिल्यानंतर पुजार्‍यांकडून कथितपणे त्यांचे शोषण कसे केले जाते याचे चित्रण केले होते. तिच्या पहिल्या चित्रपटाने मोठा वाद निर्माण झाला होता पण त्या खंबीर राहिल्या.  2004 मध्ये, त्यांनी दलित महिलांवर आणखी एक चित्रपट बनवला, ज्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. 2011 मध्ये लीना यांनी धनुषकोडी येथील मच्छिमारांच्या दुर्दशेवर ‘सेनगड’ नावाची डॉक्युमेंट्री बनवल्यानंतर आणखी एका वादाला तोंड फुटले. हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) बरोबर दीर्घ संघर्षानंतर प्रदर्शित झाला आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्याचे कौतुक झाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *