भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू मिताली राजची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

क्रीडा राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली – भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याची घोषणा तीने ट्वीट करून केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना मिताली म्हणाली, इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे हा माझा सन्मान आहे असे मी समजते.  याने मला एक व्यक्ती म्हणून निश्चितच आकार दिला आणि आशा आहे की यामुळे भारतीय महिला क्रिकेटलाही वाढण्यास मदत झाली.

39  वर्षीय मितालीने तिची 23 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवताना म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! तुमच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने मी माझी दुसरी इनिंग सुरू करण्याची तयारी करत आहे.

मिताली एक दिवसीय क्रिकेटमध्ये (वनडे)  सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज आहे. तीने  232 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 50.68 च्या सरासरीने 7805 धावा केल्या. याशिवाय मितालीने १२ कसोटी सामनेही खेळले आहेत. यामध्ये तीने 19 डावात 43.68 च्या सरासरीने 699 धावा केल्या. त्याचबरोबर 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर 2364 धावा आहेत. यामध्ये त्याची सरासरी 37.52 इतकी आहे. मितालीने एक दिवसीय क्रिकेटमध्ये  आठ विकेट्स घेतल्या आहेत.

 मितालीने 1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. लवकरच ती स्वतःच जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू बनली. मितालीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले. आता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू म्हणून तिने तिची कारकीर्द संपवली आहे.

मितालीच्या नावावर वनडेमध्ये सात शतके आणि ६४ अर्धशतके आहेत. त्याचबरोबर भारतासाठी कसोटीत द्विशतक झळकावणारी ती एकमेव महिला फलंदाज आहे. मितालीने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 214 धावा केल्या होत्या. महिला क्रिकेटमधील कसोटीमधली ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *