स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त नगरच्या पसायदान अकादमीचा अभिनव उपक्रम : मी हिंदुस्तानी एकांकिकेचे राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करणार


अहमदनगर- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त रोजी नगरच्या पसायदान अकादमीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. देशप्रेमाचा विचार समाजमनात रूजावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून साकारलेल्या ‘मी हिंदुस्तानी’ (Mi Hindusthani) या एकांकिकेचे 11 जुलै ते 15 ऑगस्ट या 35 दिवसांत राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करण्याचा संकल्प या अकादमीने केला आहे. एका दिवसात कधी तीन तर कधी चार प्रयोग होणार आहेत.

भारतीय संस्कृती, संस्कार, चालिरीती, परंपरा, शिक्षण पद्धती, हिंदुस्तानी (Mi Hindusthani) वैशिष्ठ्ये यातून निर्माण होणारा जुन्या व नव्या पिढीतील संघर्ष ‘मी हिंदुस्तानी’ या एकांकिकेत लेखक तेजस परसपाटकी व ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी यांनी सुंदरपणे उभा केला आहे. दिग्दर्शन स्वतः कुलकर्णी करीत असून कोमल पाटील यांच्यासह ते भूमिकाही करीत आहेत. त्यांना निर्मितीसाठी शैलेश देशमुख, कल्पना नवले, सरिता पटवर्धन सहकार्य करीत आहेत. शैलेश देशमुख हे संगीत देत असून सुधीर देशपांडे यांचे नेपथ्य आहे. पुण्यातील यतीन कुलकर्णी हे संपूर्ण ध्वनी यंत्रणा संभाळत आहेत. सुलभा कुलकर्णी या सूत्रधार आहेत.

अधिक वाचा  भारत सरकारच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागातर्फे एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसच्या वीर्य केंद्रांना भारतातील सर्वोत्कृष्ट वीर्यकेंद्रामध्ये अव्वल स्थान

या दीर्घांकातील आशय जितका महत्वाचा आहे तितकीच कलाकारांचं वय, हेतू, इच्छाशक्ती, संकल्प आणि समाजाप्रती, देशाप्रती असणारी बांधिलकी जास्त वाखाणण्याजोगी आहे. कारण एवढ्या कमी वेळात 75 प्रयोगांचं नियोजन, आयोजन आणि सादरीकरण ही कमालीच्या कसरतीची बाब आहे. अशा स्वरूपाचा होणारा हा प्रकल्प कदाचित एकमेव असावा. 15 ऑगस्ट रोजी संकल्पपूर्तीनिमित्त एका शानदार समारंभात करण्यात येणार आहे, अशी माहिती पी. डी. कुलकर्णी यांनी दिली.

विनामानधन सादरीकरण

राज्यभरात होणारे हे प्रयोग कुठलेही मानधन न स्वीकारता अगदी विनामूल्य तत्वावर फक्त देशप्रेमाचा विचार समाजमनात रुजावा या हेतूने केला जात आहे. एकांकिकेचे प्रयोग 11 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात होत असून 1 ऑगस्टपासून नगर शहर आणि जिल्ह्यात होत आहेत. प्रयोग आयोजित करण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी 9850057222 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन पी. डी. कुलकर्णी यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love