पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत सकारात्मक निर्णय करू -राजेश टोपे


पुणे —राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत.  त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेट मध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.Let’s make a positive decision about accepting journalists in the Corona Warrior category

पुणे येथे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले.

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने  अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संघाचे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

अधिक वाचा  अबब ..पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार करून तब्बल 13 वर्षे फिरत होता सराईत गुन्हेगार

कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याबरोबर पत्रकार ही मागे नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धा गृहीत धरून 50 लाखांचे विमा कवच जाहीर करावे, आणि तसा शासन आदेश तत्काळ निर्गमित करावा. तसेच पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबीयांना तातडीने 50 लाखांची मदत द्यावी, त्याचबरोबर जे माध्यमकर्मी, पत्रकार कोरोना बाधित होतील त्यांच्यासाठी रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून मोफत उपचार करावेत आणि त्याबाबतचे तातडीने शासन आदेश काढावेत, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love