पुणे -पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर याचाही कार्डियाक अँम्ब्युलंस न मिळाल्याने उपचाराअभावी नुकताच मृत्यू झाला. या प्रकरणाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी शुक्रवारी सविस्तर माहिती घेतली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पवारांनी तीन दिवसात सहा कार्डियाक अॅम्ब्युलंस six cardiac amulances उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
पुण्यातील बारामती होस्टेल येथे पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लोक प्रतिनिधींची आढावा बैठक घेतली. राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्टवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण सूचनाही केल्या.
कोरोनाचे आणखी १५० इंजेक्शन उपलब्ध करून देणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या रुग्णांवर उपचार होण्यासाठी ते ससून हॉस्पिटल आणि जम्बो होपितल येथे दाखल होत आहेत.
पुणे शहराचा मृत्युदर २.४० टक्के आहे. ही सामादाहांची बाब आहे. बाकी ठिकाणी हा मृत्यू दर तब्बल साडेतीन टक्के आहे, 40 टक्के रुग्ण सातारा, नगर येथून पुणे शहरात उपचारासाठी येतात. शहराच्या ५२ लाख लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ तीनच कार्डियाक अॅम्ब्युल्स उपलब्ध आहेत. त्यातील एक बंद आहे. त्याची दाखल घेऊन तातडीने ६ कार्डियाक अॅम्ब्युल्स देणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.