जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे आणि स्क्रीन लावणार- अजित पवार

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे लावले जाणार असून  स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या झालेल्या मृत्युच्या चौकशीचा अहवाल सोमवारी येईल. हा अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही  अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. 

पवार म्हणाले, “आपल्यातील एक पत्रकाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. ही अतिशय दु:खद घटना घडली. ती घटना घडल्यानंतर मी मीडियासमोर आलो नाही. मात्र, मी ताबडतोब विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. याबाबत चौकशी झाली पाहिजे. ससूनच्या टीमला त्याची जबाबदारी दिली आहे. त्याचा अहवाल सोमवारी येईल,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

 नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. जवळपास २५ ते ३० टक्के नागरिक मास्क वापरत नाही. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवलंच पाहिजे, मास्क वापरलंच पाहिजे. वेळोवेळी सॅनिटायझर किंवा स्वच्छा हात धुणं, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण काही जणांना याची फारसी गरज वाटत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

ऑक्सिजनचा हवा तसा पुरवठा नाही. आज सकाळीच याबाबत चीफ सेक्रेटरींशी बोललो. राजेश टोपेंनी काल याच्यावर बैठक घेतली. ऑक्सिजन तयार करणारे कारखाने औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजन दिलं जातं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आधी दिलं पाहिजे. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना सांगितलं आहे. ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून काही विपरीत घडू नये. त्यामुळे आम्ही जावडेकरांना सांगितलं आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले. राज्यात सध्या ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवत असून मागणीचे प्रमाण वाढले आहे. हा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारला सांगितले आहे असे   पवार यांनी  सांगितले.

एकूण ऑक्सिजन निर्मिती पैकी पंधरा टक्के भाग हा रुग्णांसाठी उपलब्ध होतो. तर अन्य निर्मिती मधील बहुतांश भाग मिळावा, जेणे करुन मागणी पूर्ण करता येणे शक्य होईल. यासाठी चर्चा सुरु आहे.  

रुग्णवाहिकेबद्दल माहिती मिळावी, याची सुविधा केली आहे. सोमवारी अधिवेशनात सार्वजनक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग यासाठी काय गरजेचं आहे. कोरोना संकटात लढत असणाऱ्या सगळ्या विभागांची माहिती आम्ही घेतली आहे. त्याबाबत पुरवणी मागण्यांमध्ये या सगळ्या विभागांसी संबंधित मागण्या कशा आणता येतील, याबाबत प्रयत्न करु. अधिवेशन सोमवारी असल्याने त्याबाबत जास्त बारकाईन बोलणं सूचित दिसणार नाही,” असे अजित पवार म्हणाले

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *