26 जानेवारी हिंसाचार: आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना दिल्ली पोलिसांचे पथक आज का घेऊन गेले लाल किल्ल्यावर?

राष्ट्रीय
Spread the love

दिल्ली(ऑनलाइन टीम)— केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान जो हिंसाचार झाला त्यातील आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना घेऊन दिल्ली पोलिसांचे पथक आज लाल किल्ल्यावर गेले. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम या दोघांची चौकशी करीत आहे. तपास फार महत्वपूर्ण मानला जात आहे. हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांना जाणून घ्यायची आहेत. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर जो हिंसाचार झाला हे समजून घेण्यासाठी पोलिस ते दृश्य (‘सीन) पुन्हा तयार करून या घटनेचा तपास करीत आहेत. जेणेकरुन लोक इथपर्यंत कसे पोहचले?, हिंसा कशी झाली?,त्यांनी काय केले? आणि हिंसा केल्यानंतर ते कसे परतले? यांची माहिती पोलिसांना मिळू शकेल.

यापूर्वी आरोपी दीप सिद्धूने पोलिस चौकशीत अनेक खुलासे केले आहेत.  दीप सिद्धूने सांगितले की लाल किल्ल्याच्या हिंसाचारानंतर संदीप सिंह उर्फ ​​दीप सिद्धूने सोनीपतमध्ये आपला मोबाईल बंद केला होता. त्यानंतर त्याने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांच्या मोबाईल नंबरचा वापर केला होता. त्याने या लोकांच्या नावाने कित्येक दिवसांपासून फोन कॉल केले होते.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनेच्या तपासातही  दीपू सिद्धू यांनी व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजरवर दोन ग्रुप तयार केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.  या ग्रुपमध्ये लक्खा सिधाना आणि जुगराज सारख्या आरोपींचा समावेश होता. लाल किल्ल्याच्या तटबंदीवर जुगराज यांनी ध्वजारोहण केले होते.

गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या  म्हणण्यानुसार हे ग्रुप  खूप पूर्वी तयार करण्यात आले होते आणि या ग्रुपमध्ये कट रचण्याची बरीच चर्चा केली जात होती. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये काय घडले याचा शोध घेण्यासाठी पोलिस दीपचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविणार आहेत. त्यावरून या तयार करण्यात आलेल्या व्हाटस्अॅप ग्रुपवर काय चर्चा केली जायचे हे पोलिसांना समजेल.

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक तपासणीनंतर आरोपींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर झेंडा फडकिवण्याचा आणि हिंसाचार करण्याचे षडयंत्र रचल्याचे संकेत मिळाले आहेत. मोबाईलच्या फॉरेन्सिक अहवालानंतरच हे उघड होईल.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दीप सिद्धू करनालमधील एका हॉटेलमध्ये राहत होते. वास्तविक, दीप 26 आणि 27 जानेवारीपर्यंत दोन मोबाइल नंबर वापरत होता. विशेषत: ‘कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर)’च्या माध्यमातून  26 जानेवारीच्या दिल्ली हिंसाचारात त्याची उपस्थिती कशी होतील हे पोलिस सिद्ध करतील.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *