जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि मग आम्हाला सल्ले द्यावेत- चंद्रकांत पाटील


पुणे(प्रतिनिधी)—पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता मतदारांशीसंपर्क महत्त्वपूर्ण असून, दिवाळीनंतरचे 12 दिवस पक्षातीलसर्वांनी प्रचाराकरिता पूर्ण वेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बोगस मतदान राखणे, याकरिता वेळ पडल्यास संघर्ष करणाऱया टग्या कार्यकर्त्यांना बूथ केंद्रावर बसवले पाहिजे,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीपुणे पदवीधरसाठी गुरुवारी आपली रणनीती स्पष्ट केली. जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि मग आम्हाला सल्ले द्यावेत, असे प्रत्युत्तरही त्यांनी या वेळी दिले.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुखयांच्या प्रचारार्थ पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱयांची बैठक पुण्यात आयोजित करण्यातआली होती. त्या वेळी खासदार गिरीष बापट, माजीमंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, लक्ष्मण ढोबळे, दिलीप कांबळे, बाळाभेगडे, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, धनंजयमहाडिक, आमदार शिवेंद्रराजे, गोपीचंद पडळकर,शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  हे कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात? बाळासाहेब थोरातांचा पलटवार

पाटील म्हणाले, बूथवर तयार कार्यकर्तेहवेत. ज्यांनी मतदारांचे ओळखपत्र, आधारकार्डदाखवा, असे म्हटले पाहिजे. सुरुवातीला दोन-चारजण हाकलून दिले, की कळते कडक शिस्तीत मतदान सुरू आहे.शेवटचा तास निवडणुकीत महत्त्वपूर्ण असतो. त्यावेळीबोगस मतदान अधिक होत असते. महाराष्ट्रातील पाचही जागा जिंकूनआणण्याचे आपले लक्ष्य आहे. पुणे पदवीधर निवडणूक प्रति÷sची झालेली आहे, असे वाटते. त्यासवेगवेगळी कारणे असून, ती जाहीरपणे मांडण्याची गरज नाही.वेळोवेळी मतदार नोंदणी वाढवा, असे मी अनेकदा सांगितले.सन 2008 मध्ये मी पदवीधर निवडणुकीत आणि भगवानराव साळुंखे शिक्षक मतदारसंघात पुणे विभागातून प्रथम निवडून आलो. आम्ही दोघे कसे निवडून आलो, हे अनेकांना समजले नाही.त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विरोधकांचा गड फुटला. पुढे या भागातून पक्षाचे आमदार, खासदार निवडून आले.केंद्रात-राज्यात पक्षाचे सरकार आले. त्यातून काँग्रेसला हा मतदारसंघ महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव झाली.एकाला उमेदवारी जाहीर झाली, की आपल्याकडे इतर सर्व इच्छुक त्याचे काम करण्यास लागतात.

अधिक वाचा  मी गाऱ्हानी मांडण्याइतका लेचापेचा आणि आंडूपांडू नाही -सुरेश धस

विरोधकांचे तसे नसते,हे मी माझ्या निवडणुकीच्या वेळी जवळून पाहिले, असा चिमटाही त्यांनी काढला. शिक्षक मतदारसंघावरही लक्ष्य केंद्रित कराकाँग्रेसला निवडणुका कशाप्रकारे लढवायच्या, याचे डावपेच वर्षानुवर्ष माहीत होते. आता आपणही ही नितीबऱयपैकी शिकलो आहोत. देशभर आपण हे दाखवून दिले आहे. पदवीधर निवडणूक त्यामानाने सोपी आहे. मागील सहा महिन्यातमोठय़ा प्रमाणात आपण नवीन मतदार नोंदणी केलेली आहे. शिक्षक मतदारसंघावरलक्ष्य केंद्रित करून ती जिंकून आणण्याचा प्रयत्न करा, अशी सूचनाहीत्यांनी केली.

 विधानसभेत थांबल्याची पावती

 संग्राम देशमुखसंग्राम देशमुख म्हणाले, अनेक दिग्गजांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले असून त्यांचा वारसदार म्हणूनमला संधी मिळाली आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात इच्छुक होते.आपण प्रमाणिकपणे मतदारसंघ सांभाळण्याचे काम करू. विधानसभेत थांबल्याची पावती मला आता मिळाली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love