पुणे-विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने भाजपचा पराभव झाला. राज्याच्या पुढील विधानसभा निवडणूकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपच्या 50 पेक्षा जास्त जागा जिंकून येऊ शकत नाहित, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार्या उपक्रमांकाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हैदराबाद आणि राजस्थान येथील स्थानिक निवडणूकीत भाजपला यश आले असले तरी तिथले स्थानिक प्रश्नवेगळे होते. तसेच,राजस्थानमधील काँग्रेस पक्षांतर्गत काही प्रश्न आहेत का, याचा उहापोह करावा लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयावरील प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी व्यक्त केली आहे. पुणे आणि महाराष्ट्रातील पाfरस्थिती वेगळी आहे. तीन पक्षांच्या जोरावर भाजपला पराभूत करता येऊ शकते. भाजपचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे, असे ते म्हणाले.
राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने पंचायत समितीच्या ४३७१ पैकी १८३५ आणि काँग्रेसने १७१८ जागा जिंकल्या आहेत. त्याप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ६३६ जागांपैकी २६६ जागांवर, तर काँग्रेसने २०४ जागांवर विजय मिळवला आहे.
शरद पवार यांच्यावर बायोपिकची निर्मीती करण्याचा अजून विचार केला नाही. लघुपट स्पर्धेच्या माध्यमातून बायोपिकबाबत शरद पवार यांच्यावर बायोपिक बनवण्याचा मार्ग दिसून आला, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि पक्षांतर्गत उपक्रमातून साजरा केला जाणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना आमंत्रण दिलेले नाही. कोरोना असल्याने आम्ही काळजी घेत आहोत. मुंबईमध्ये सकाळी 11 वाजता यशंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मोजक्या लोकांमध्ये कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम 36 जिल्ह्यात आणि 350 तालुक्यात दाखवला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सदस्य नोंदणी देखील होणार असून, याची पावती डिजीटल माध्यमातून फाडली जाणार आहे. तसेच 13 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्याच्या वेगवेगÈया भागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचेहि पाटील यांनी यावेळी नमूद केले.