पुण्याच्या कोथरूड भागात रानगव्याचे दर्शन: उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू


पुणे-  पुण्याच्या कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ऐन थंडीच्या हंगामात चक्क एक रान गव्याचेन दर्शन नागरिकांना झाले आणि एकाच धावपळ उडाली. पुण्यासारख्या शहरात गव्याचे दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. वनक्षेत्रातून वाट चुकलेला गवा महात्मा सोसायटील आला होता. दरम्यान, वनविभागामार्फत अथक प्रयत्न करून गव्याला ट्रॅन्क्युलाईज करुन पकडण्यात आले मात्र, उपचारादरम्यान या रानगव्याचा मृत्यू झाल्याचा समजल्यानंतर नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती.

कोथरुड येथील महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक 1 येथील मोकळ्या जागेमध्ये आज सकाळी हा गवा दिसला. नेहमीप्रमाणे, सकाळी मॉर्निंग वॉक, जॉगिंग करण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. त्यावेळी महात्मा सोसायटीच्या मोकळ्या जागेत भलामोठा गवा पाहण्यास मिळाला. आधी लोकांना गाय असावी असं वाटलं. पण, तो गवा असल्याचे  लक्षात आल्यानंतर एकाच धावपळ उडाली.

अधिक वाचा  अन्.. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही; निवडून आलेल्या पतीला खांद्यावर घेत काढली गावभर मिरवणूक

पुणे वन विभागाला महात्मा सोसायटीमध्ये  नर जातीचा रानगवा आल्याची बातमी समजताच वन विभागाचे अधिकारी-कर्मधारी. तसेच बावधन व कात्रज येथील रेस्क्यु टिम यांना घेवून घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यु करायचे अथक प्रयत्न करुन हा रान गवा जेरबंद करण्यात आल्याची माहिती पुणे वन विभागाने दिली. वन विभागामार्फत रेस्क्यू टिमच्या गदतीने रेस्क्यू करण्याथे अथक प्रयत्न करण्यात आले. यावेळी इंडियन हरपॅटॉलोजिकल सोसायटी पुणे, RESO संस्था बावधन व कात्रज प्राणीसंग्रहालय यांनी रेस्क्यु मध्ये विशेष प्रयत्न केले. हा रानगवा नर जातीचा होता (Indian Gaur)  त्याचे वजन अंदाजे ७०० ते ८०० किलो होते. त्याची उंची ५ ते ५.३० फूट आहे. त्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे होते.

महात्मा सोसायटी कोथरुड येथील सर्व नागरिकांना घरात थांबायला सांगून रेस्क्यु टिमचे दतीने जाळी लावून, ट्रॅन्क्युलाईज करुन रेस्क्यु करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु गव्याने हुलकावणी देवून तो पसार झाला. त्यानंतरही वनविभागामार्फत अथक प्रयत्न करून गव्याला ट्रेन्क्युलाईज करुन पकडण्यात आले उपचारादरम्यान सदर रानगवा हा मृत्यु पावल्याचे निदर्शनास आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love