संजय राठोड यांची भेट झाल्यावर त्यांना सांगेन पत्रकार तुमची….अजित पवार


पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि भाजपने याविरोधात आंदोलन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, संजय राठोड यांचे या प्रकरणात नाव आल्यानंतर ते गेल्या बारा दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोनही नॉट रीचेबल आहे. राठोड हे शिवसेनेचे मंत्री असल्याने त्यांना सध्या याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास अथवा कोणाच्याही संपर्कात न राहण्याचा सल्ला पक्षाकडून दिला गेला असल्याचे बोलले जात होते तर त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल असल्याचे वृत्तही काही वाहिन्यांनी दिले होते. मात्र, राजीनामा देण्याबाबतही मतमतांतरे असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा भावी सहकारी म्हणून उल्लेख : काय म्हणाले अजित पवार?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संजय राठोड यांच्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने आणि ते गायब असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी संजय राठोड गायब आहेत, ते माध्यमांसमोर कधी येतील असे विचारले असता, अजित पवार यांनी संजय राठोड यांची भेट झाली तर त्यांना, तुमची सर्व पत्रकार आत्मियतेने वाट पहाट आहेत, त्यांना एकदा भेटा, असे नक्की सांगेन अशी मिश्किल टिप्पणी केली. या प्रकरणाचा पोलिस योग्य तपास करतील आणि सत्य समोर आणतील असेही ते म्हणाले. दरम्यान, एकेकाळी एखादा आरोप झाला की लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचे पण तो काळ आता राहिला नसल्याचेही पवार यांनी नमूद केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love