अजित पवारांचे दुखणे काय आहे हे मला माहिती आहे- का म्हणाले देवेंद्र फडणवीस असं?


पुणे- एक वर्षापूर्वीचे अजित पवारांचे बंड अजूनही कोणी विसरलेले नाही. अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार आकार घेत असताना आकस्मित बंड केले होते.  भाजपाबरोबर हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र, तेच अजित पवार आता भाजपवर टीका करत आहेत.

105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे भाजपच  खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात’ अशी खोचक टीका अजित पवारांनी केली होती. तसेच ‘आता महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यांचे आशिर्वाद आहे, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला होता.

अधिक वाचा  लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा 

याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी छेडले असता, फडणवीस यांनी अजित पवारांचे दुखणे काय आहे हे मला माहिती आहे, पण मी त्यावर बोलणार नाही, असे मिश्कील उत्तर दिले.  

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पडेल असा डोळा लाऊन आम्ही बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहोत. मात्र, हे सरकार अनैसर्गिक सरकार आहे. अशा प्रकारचे अनैसर्गिक सरकार जास्त दिवस चालत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे जेव्हा हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ असेही फडणवीस म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love