पुणे-महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा. अशा प्रकारे गैरवापर करणे ही अक्षम्य चूक आहे अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील एका मोठ्या विडी कंपनीला खडसावलं आहे.महापुरुषांच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा फंडा आजकाल सर्रासपणे चालू आहे. यावरती आता आमदार...
पुणे--पुणे शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरात कुठेही लॉकडाऊन जारी करण्यात येणार नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शहरातील काही भाग नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानंतर आज शहरातील सूक्ष्म...
क्राईम
मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलीस निरीक्षकाने सहा जणांना ठोकरले ; एकाचा मृत्यू ५ जखमी
News24Pune -
पुणे--पोलीस दलातून पोलीस निरीक्षक म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला. भरधाव वेगात जाणारी ही गाडी थेट एका दुकानात शिरली आणि तिथे उभे असलेल्या सहा जणांना ठोकरले. त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तसेच पाच जण जखमी झाले. बालेवाडीतील ममता चौकात हा अपघात झाला.
पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागलेल्या पांडुरंग रायकर यांच्या मृत्युनंतर पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर, प्रशासनावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुमुख्य्मंत्री अजित पवार यांनीही तातडीची बैठक घेवून बदल करण्याच्या सूचना केल्यानंतर जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसल्याचे चित्र आहे. जम्बो कोविड सेंटरमधील कामकाज पुणे महापालिका...
पुणे-- कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृती भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क शिवाय रस्त्यावर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी दिल्या. कोविड 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व...
पुणे – पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे लावले जाणार असून स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार असल्याची माहिती...













