धक्कादायक; ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्यांना स्थगिती. का दिली स्थगिती?

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

पुणे- ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्या घेण्यात येत आहेत. भारतातही सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून या लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ती व्यक्ती आजारी पडल्याने या लसीच्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. तर पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या वतीने पुण्यात सुरु असलेल्या चाचणीत सहभागी व्यक्तीवर संशयास्पद प्रतिकूल परिणाम दिसल्याने पुण्यातील चाचणीलाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.जगाचे लक्ष या लसीकडे लागलेले असताना अचानक ही धक्का देणारी बातमी आली आहे.

 पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोव्हिड 19 लशीची चाचणी आणि उत्पादन केले जात होते. पुण्यातील पाच जणांपासून ही मानवी चाचणी सुरु झाली. त्यापैकी तिघा जणांमध्ये अँटीबॉडी दिसल्याने ते बाद ठरले, तर दोघांना वैद्यकीय त्रास सुरु झाले.

कोव्हिड 19 वर लस तयार करण्याच्या शर्यतीत अग्रणी असलेल्या ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले, की कंपनीच्या आढावा प्रक्रियेत लसीकरण संशोधनाला विराम देऊन सुरक्षेबाबत पुन्हा आढावा घेण्याचे ठरले आहे. सहभागी व्यक्तीवर दिसलेल्या प्रतिकूल प्रतिक्रियेचे स्वरुप आणि ते केव्हा झाले, हे समजलेले नाही, मात्र त्याची प्रकृती ठीक होण्याची अपेक्षा केली जात आहे.

“जेव्हा एखाद्या चाचणीमध्ये संभाव्य अज्ञात आजार दिसतो, तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात. मात्र आम्ही या चाचणीची अखंडता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करु” असेही ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

डिसेंबरपर्यंत कोट्यवधी डोसची निर्मिती होईल. भारतामध्ये डिसेंबरमध्ये या लसीची परवाना प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर डिसेंबरमध्ये लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजीव ढेरे यांनी म्हटलं आहे.

चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे ही लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगाचे लक्ष या लसीकडे लागलेले असताना अचानक ही धक्का देणारी बातमी आली आहे.

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ती व्यक्ती आजारी पडली. त्यामुळे ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेकाने या लसीच्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला

भारतातही सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून या लसीच्या दुसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहे. भारतातील चाचण्याचे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर सिरम इन्स्टिट्युटने स्पष्टीकरण दिले आहे.

भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीमध्ये असे काहीही गंभीर आढळून आलेले नाही” असे सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी इंडिया टुडेशी बोलताना बुधवारी सांगितले.

यूकेमधल्या घटनेचा भारतात सिरम इन्स्टिट्युटकडून सुरु असलेल्या मानवी चाचण्यांवर परिणाम होणार नाही” असे अदर पूनावाला यांनी सांगितले. “यूकेमधल्या व्यक्तीवर जी रिअ‍ॅक्शन झाली त्याचा थेट लसीशी संबंध नाहीय. ज्या व्यक्तीवर रिअ‍ॅक्शन झाली, त्याला आधीपासून काही न्यूरोलॉजिकल समस्या होती. लस चाचणीमध्ये अशा घटना होतात” असे अदर पूनावाला म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *