आरोग्य
धक्कादायक; ‘अॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्यांना स्थगिती. का दिली स्थगिती?
News24Pune -0
पुणे- ‘अॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 या लसीच्या मानवी चाचण्या घेण्यात येत आहेत. भारतातही सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून या लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा डोस दिल्यानंतर ती व्यक्ती आजारी पडल्याने या लसीच्या चाचणीला स्थगिती देण्यात आली आहे. तर पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या वतीने पुण्यात सुरु...
पुणे - पुण्यातील जम्बो रुग्णालयाबद्दल असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट जम्बोतील उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत जम्बोच्या परिस्थितीत सुधारणा होत असून येत्या दोन दिवसांत आणखी बेड्स रुग्णसेवेत उपलब्ध होणार आहेत. शिवाय भेटीदरम्यान अधिकाऱ्यांशी चर्चा करत महापौरांनी विविध सूचनाही दिल्या आहेत.
राजकारण
मनसेच्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना अटक व सुटका; काय केलं होतंं रुपाली पाटील यांनी?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील वादग्रस्त 'जम्बो हॉस्पिटल'मधील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करून त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी गेटवर चढून जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रवेश करून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्ष ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली . मनसे स्टाईलने आंदोलन करत गेटवरून चढून त्यांनी रुग्णालयात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी या...
राजकारण
संजय राऊत यांच्या ‘हरामखोर’ या विधानावर अमृता फडणवीस यांचा टोला; काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
News24Pune -
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत ‘हरामखोर’ असा शब्दप्रयोग केल्याने वादंगाला तोंड फुटले आणि त्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत शाब्दिक चकमकी घडत आहेत. आता या वादामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत “आम्ही विचार केला त्यापेक्षाही...
राजकारण
कोरोनाच्या स्थितीवरून फडणवीस यांनी धरले राज्य सरकारला धारेवर; काय म्हणाले फडणवीस?
News24Pune -
मुंबई- विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अनेक जाब विचारात धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई बघायची आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुणे बघायचे, मग इतर ठिकाणी कोण लक्ष देणार? नागपूर औरंगाबादकडे कोण लक्ष देणार? मुंबई-पुण्याइतकंच तुमचं राज्य मर्यादित आहे का? असे सवाल करीत पुण्यातल्या जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर या उमद्या पत्रकाराचा...
मुंबई- अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या रिया चक्रवर्ती हिला आज अखेर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मोठी कारवाई करत अटक केली. रिया चक्रवर्तीपूर्वीच भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे. सुशांतसिंह याच्या फ्लॅटमध्ये १४ जून रोजी त्याचा मृतदेह लटकलेला आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. परंतु, सुशांतसिंहने आत्महत्या नव्हे तर...














