अर्थ
पील-वर्क्सची दुसऱ्या-तिस-या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्ताराची योजना :२२५ कोटी रुपये गुंतवणार
News24Pune -0
पुणे -किराणा व्यापा-यांना मालाचा पुरवठा करणा-या (बिझनेस टु बिझनेस ) पीलवर्क्स ने भारतातील दुस-या- तिस-या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली असून त्यासाठी २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सिद्धता केली आहे. कंपनी सध्या तायकी या स्मार्टफोन ऍप वर व्यवसाय करते आणि देशातल्या १० प्रमुख शहरांत तिचा व्यवसाय आहे. कंपनी स्थानिक किराणा दुकानांना नित्याच्या वापराच्या वस्तू (एफएमसीजी) आणि ग्राहकोपयोगी उत्पादने पुरवते. कोरोना व्हायरस...
मुंबई- रिलायन्स ज्वेल्स या भारताच्या सर्वात विश्वसनीय ज्वेलरी ब्रॅण्डने उत्सवी हंगामाच्या शुभारंभानिमित्त आकर्षक दागिन्यांची रेंज 'उत्कला' सादर केली आहे. हे कलेक्शन 'ओडिशा'च्या सांस्कृतिक परंपरांमधून प्रेरित आहे. या कलेक्शनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना, नमुना व डिझाइन्सचा समावेश आहे, ज्यामधून परिपूर्ण कलाकृती, परंपरा व संस्कृती दिसून येते.या खास कलेक्शनमध्ये आकर्षक डिझाइन्सचा समावेश आहे, जेथे ग्राहक...
शिक्षण
एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे फाईव्ह स्टार रेटिंग
News24Pune -
पुणे- एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला (आयआयसी एमआयटी एडीटी) केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईद्वारा 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या मनात नवनिर्मिती आणि उद्योजकीय कौशल्य रुजविण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईने या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला होता. यंदाच्या फाईव्ह स्टार रेटिंगसाठी 1110...
पुणे- दहावी- बारावीच्या निकालानंतर जुलै- ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा येत्या नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ते २९ ऑक्टोबरदरम्यान नियमित शुल्कासह आणि ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. पुरवणी परीक्षा आणि श्रेणीसुधारसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना...
क्राईम
पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस मुख्यालयात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न: का केले असे?
News24Pune -
पुणे- सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद झाल्याने त्या महिलेले ठाणे अंमलदाराकडे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार नोंदविली आणि आता नाचक्की होणार या भीतीने ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गार्ड अंमलदाराची बंदुक हिसकावून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला.
प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक एक्टर्स कसून मेहनतही घेताना आपण पाहतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची वाहवाही मिळाली आहे. आणि आता ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’नेही सईच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटा मधल्या भूमिकेसाठी ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ दि इयर’ हा पुरस्कार देऊन सईच्या नैसर्गिक अभिनयाला पोचपावती दिलीय.झी...














