पील-वर्क्सची दुसऱ्या-तिस-या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्ताराची योजना :२२५ कोटी रुपये गुंतवणार

अर्थ
Spread the love

पुणे -किराणा व्यापा-यांना मालाचा पुरवठा करणा-या (बिझनेस टु  बिझनेस ) पीलवर्क्स ने भारतातील दुस-या- तिस-या क्रमांकांच्या शहरांत व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली असून त्यासाठी २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सिद्धता केली आहे. कंपनी सध्या तायकी या स्मार्टफोन ऍप वर व्यवसाय करते आणि देशातल्या १० प्रमुख शहरांत तिचा व्यवसाय आहे.  

कंपनी स्थानिक किराणा दुकानांना नित्याच्या वापराच्या वस्तू (एफएमसीजी) आणि ग्राहकोपयोगी उत्पादने पुरवते. कोरोना व्हायरस च्या साथीदरम्यान कंपनीच्या व्यवसायात दरमहा २० टक्के वाढ झाली आहे.  शहरांमध्ये गल्लोगल्ली असलेली किराणा दुकाने हा एफएमसीजी उत्पादनांच्या रिटेल (किरकोळ) विक्रीचा कणा असतो त्यामुळे कंपनीने मेट्रो शहरांच्या पलीकडे जात जास्त मोठ्या संख्येने किराणा व्यापा-यांना आपल्या व्यवसायात समाविष्ट करून त्यांना तायकी ऍप च्या  माध्यमातून अनेकविध वस्तू किफायतशीर दरात आणि त्वरित पुरवण्याची योजना आखली आहे.  

कोरोनाच्या संकटामुळे बिझनेस टु बिझनेस व्यापाराला किती मोठा वाव आहे हे स्पष्टपणे दाखवून दिले आणि अनेक नव्या बीटुबी तंत्रज्ञान कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या पायावर आम्ही २०२१ पर्यंत ३० शहरांत आमचा व्यवसाय विस्तारण्याची आणि एक लाख व्यापा-यांना आमच्या व्यवसायात समाविष्ट करून घेण्याची योजना आखली आहे. यासाठी आम्हाला समभाग निधी (इक्विटी) आणि कर्ज अशा दोन्ही मार्गानी ३ कोटी अमेरिकन डॉलर (रु.२२५ कोटी) एवढे पैसे उभारायचे आहेतअसे पीलवर्क्स चे संस्थापक सचिन छाब्रा यांनी सांगितले.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *