एमआयटी एडीटी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे फाईव्ह स्टार रेटिंग


पुणे- एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलला (आयआयसी एमआयटी एडीटी) केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईद्वारा 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या मनात नवनिर्मिती आणि उद्योजकीय कौशल्य रुजविण्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईने या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला होता. यंदाच्या फाईव्ह स्टार रेटिंगसाठी 1110 संस्थांनी सहभाग घेतला होता. यापैकी देशातील 115 संस्थांची निवड करण्यात आली होती. यात एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचा पहिल्या 50 फाईव्ह स्टार रेटिंगमध्ये संस्थामध्ये समावेश आहे. याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल आणि राज्यमंत्री, शिक्षण मंत्रालय (एमओई) संजय शामराव धोत्रे, यांनी राष्ट्रीय इनोव्हेशन दिवसानिमित्त नुकतीच केली.

अधिक वाचा  पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार, मात्र....


आयआयसी-एमआयटीएडीटी विद्यापीठाने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, डिझाईन थिंक कार्यशाळा, उद्योजकता शिबिरे, लीडरशिप चर्चा, राष्ट्रीय नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी आणि विद्याशाखांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी वेबिनार घेतले होते. याची नोंद घेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा सन्मान केला आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांना सन्मानाबाबत आयआयसी-एमआयटी एडीटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. वीरेंद्र भोजवानी आणि त्यांच्या टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love