राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात केली जाईल-राजेश पांडे


पुणेः- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षणातील सर्व घटकांबरोबर संवाद साधला जाईल. विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत हे धोरण पोहोचविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला जाईल. तसेच संस्थांचे प्राचार्य आणि संचालक यांच्याकडून सूचना मागवल्या जातील, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात केली जाईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे राजेश पांडे यांनी सांगितले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली असून या समितीची पहिली बैठक नुकतीच झाली. त्यावेळी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्या टप्प्यात होईल, असे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे देशात भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’ : देश विदेशातील १३० शास्त्रज्ञांचा सहभाग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या  समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शिरीष केदारे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, अधिष्ठाता प्रा. डॉ. संजीव सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ नितीन करमळकर तसेच प्रकुलगुरू एस एन. उमराणी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली आणि ही समिती कार्यरत असेल.

समितीच्या पहिल्या बैठकीत बोलताना डॉ शिरीष केदारे म्हणाले की,  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना सुसूत्रता असली पाहिजे. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या अंमलबजावणी समितीशी संवाद साधला पाहिजे. डॉ  राजीव सोनवणे यांनी शिक्षक प्रशिक्षणावर भर देणे गरजेचेचे असल्याचे सांगितले, तर डॉ संजय चाकणे यांनी प्राध्यापक आणि प्राचार्य यांचे प्रश्न ऐकून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. साबडे यांनी लेख व वर्तमानपत्रातून जागृती करण्याचे आवाहन केले. तर डॉ. सुधाकर जाधवर यांनीही संचालकांशी संवाद साधता येईल असे सांगितले. डॉ.एस.एन उमरानी यांनी या समितीने विद्यार्थी संवाद साधणे महत्वाचे असल्याचे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love