पुणे -रंगभूमीवर किंवा नाट्यगृहातील रंगमंचावर आलं की मला इलेक्ट्रीफाइन electrifine झाल्यासारखं वाटतं. आजही ते फिलिंंग आहे. कारण रोज स्वत:ला नवे काही तरी शिकण्याची संधी जेथे मिळते ते ठिकाण म्हणजे रंगमंच किंवा रंगभूमी होय. त्यामुळे प्रत्येकाने नाटक करायला पाहिजे,अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले vikram gokhale यांनी आज व्यक्त केल्या. यावेळी नटखट उल्लेख करत ज्या...
पुणे—गेल्या ३३ दिवसांपासून बेपता असलेले पुण्यातील प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आल्यानंतर पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण काय होते? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आर्थिक नुकसानामुळे गौतम पाषाणकर नैराश्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या 34 दिवसात त्यांनी देशाच्या विविध शहरांत प्रवास केल्याचं समोर आलं आहे.
पुणे- एक वर्षापूर्वीचे अजित पवारांचे बंड अजूनही कोणी विसरलेले नाही. अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार आकार घेत असताना आकस्मित बंड केले होते. भाजपाबरोबर हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र, तेच अजित पवार आता भाजपवर टीका करत आहेत.105 आमदार असताना...
पुणे- कुणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. भ्रष्टाचार बाहेर काढला की महाराष्ट्रद्रोही, आपल्या अंगावर आले की महाराष्ट्रद्रोही अशी शिवसेनेची गत आहे. परंतु, ते म्हणजे महाराष्ट्र हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घ्यावे असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त फडणवीस पुणे दौर्यावर...
नवी दिल्ली( ऑनलाईन टीम)—भारतीय राजकारणात कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे 3.30 वाजता वडील अहमद पटेल यांचे निधन झाल्याचे अहमद पटेल यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ट्विट केले...
पुणे -पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन करीत असलेल्या कार्यावरून आपल्याला कमी वापर(REDUCE), पुनर्वापर(REUSE) आणि पुनर्चक्रीकरण (RECYCLE) या त्रिसूत्रीचे आपल्या जीवनात किती महत्व आहे याची प्रचीती येते. ‘पूर्णम’ करीत असलेले हे कार्य खरोखर समाजभान जागृत करणारे आणि समाजाला दिशा देणारे आहे असे गौरोद्गार जनसेवा बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी काढले.शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी...














