gtag('js', new Date());
मुंबई -जगातील आघाडीची माहितीपट निर्माती क्युरिऑसिटी स्ट्रीम आणि भारतातील सर्वात मोठी पे टीव्ही (डायरेक्ट टु होम) कंपनी टाटा स्काय यांनी माहितीपट आणि माहिती मालिका असे हजारो तासांचे मनोरंजन टाटा स्काय प्रेक्षकांसाठी उपलब्ध  देण्यासाठी एक करार केला आहे.  क्युरिऑसिटी स्ट्रीम चे अनेक पुरस्कार विजेते माहितीपट आता टाटा स्काय बिंज या ओव्हर द टॉप (ओटीटी ) सेवेमार्फत उपलब्ध होणार आहेत.  टाटा स्काय बिंज चा स्मार्ट सेट...
पुणे-- कोरोना विषाणूच्या पुनर्निर्मितीला रोखणा-या ‘फेविपिरविर’‘Favipirvir’ (फॅबिफ्ल्यू)(Fabiflu) या तोंडावाटे घेण्याच्या  औषधाच्या उपचाराने सौम्य ते मध्यम कोरोनाग्रस्त  रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा या औषधाची निर्मिती करणाऱ्या  ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने केला आहे.  तिस-या टप्प्याच्या रँडमाइज्ड चाचणीत ही निरीक्षणे नोंदली गेली असून इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शस डिसीजेस (आयजेआयडी) मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. 
पुणे—पुण्यातील हडपसर भागातून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा हडपसर भागातील गाडीतळ येथून झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात यासंबंधी अज्ञात आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हडपसर भागात होणाऱ्या लहान बालकांच्या अपहरणाच्या प्रकारांमुळे या भागात घबराट पसरली आहे. कार्तिक नीलेश...
पुणे-- गेल्या ३३ दिवसांपासून बेपता असलेले पुण्यातील प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले असून पाषाणकर यांना राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी   मंगळवारी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर...
पुणे – पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडी, भाजप आणि मनसेच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याची तक्रार पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.पुणे पदवीधर मतदार संघातील प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील यांच्यात खरी लढत होणार...
पुणे—भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अभ्यास नसलेले छोटे नेते अशा शब्दांत टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द पेटले आहे. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा...