gtag('js', new Date());
पुणे-मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासुन प्रलंबित आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर आपआपल्या वाहनातून धडक मोर्चा काढणार आहे. असा निर्णय मराठा क्रांती राज्यस्तरीय निर्णायक बैठकीत झाला आहे. अशी माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुणे- महाराष्ट्रामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा जो खेळ सुरु आहे त्यामध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा याबाबत सर्वच पक्षांनी एक दिवस एका बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, चंपा, टरबुज्या काय भाषा वापरता. राष्ट्रवादीचे राज्याचे...
पुणे(प्रतिनिधी)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटला भेट दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला  यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेली कोव्हीशिल्ड लस सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड लस...
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत असलेल्या कंपन्यांना भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. मोदींनी गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच सरकारच्या...
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे त्यांना  पण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले होते. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. सलग...
पुणे- मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. सुरुवातीपासूनच आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र काही जण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असूनही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल, असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय  महात्मा फुले समता परिषदेचे...