तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तोडीस तोड उत्तर देणार – ब्राह्मण महासंघ


पुणे-शिर्डी संस्थानने भाविकांच्या पोषाखाबाबत जो काही निर्णय घेतला आहे, त्याला ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशाराही ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.

ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष ऍड. नीता जोशी म्हणाल्या, शिर्डी देवस्थानने पालकांच्या पोषाखाबद्दल जो काही निर्णय घेतला आहे, त्याला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा आहे. देवस्थानच्या या निर्णयाबद्दल तृप्ती देसाई यांची काही तक्रार असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, हे योग्य नाही. त्यांनी शिर्डीमध्ये जाऊन तो फलक हटवण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्यांना तोडीस तोड उत्तर देईल.

अधिक वाचा  'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम'च्या जयघोषात पार पडला माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा

शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांनी भारतीय पोशाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने केली आहे. यावरून आता मोठा वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही, तर आम्ही स्वतः येऊन काढू, असा इशाराच दिला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love