gtag('js', new Date());
नवी दिल्ली - भारताने अमेरिकेला शस्त्रास्त्र विक्रीच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सेवा प्रदान कारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार आहे.इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने त्यांच्या नौदलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रशिक्षकांचा शोध सुरू केला आहे. त्यानंतर भारताने अमेरिकेला प्रस्ताव सादर केला आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बिडेन यांनी कोरोनाव्हायरस साथी विरुद्ध लढण्यासाठी देशात मास्क घालणे सक्तीचे करणार असल्याची घोषणा केली आहे.  जो बिडेन म्हणाले की, आपली १०० दिवसांची योजना आखताना आपण आपल्या प्रशासनाच्या पहिल्या दिवशी मास्क घालण्यासाठीच्या जनादेशावर स्वाक्षरी करणार आहे.   बिडेन आपल्या प्रशासनातील प्रमुख आरोग्य सल्लागारांची ओळख करून देताना म्हणाले कि, मला पूर्ण खात्री...
पुणे--एखाद्या 25 वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे असे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे म्हणाले. "होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं "या म्हणीचा प्रत्यय ८० वर्षाच्या शरद पवारांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला त्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्यांची भीती वाटते असेही ते म्हणाले.
पुणे--शिर्डी परिसरात येण्यास बंदीची नोटीस एकतर्फी असून काहीही झाले तरी 10 डिसेंबरला शिर्डीत जाणारच असे सांगत शिर्डी संस्थानने पोषाखासंदर्भात लावलेला फलक काढून टाकावा अन्यथा दहा डिसेंबरला स्वतःहुन हा बोर्ड काढू असा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. तृप्ती देसाईंना शिर्डी...
पुणे-  पुण्याच्या कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ऐन थंडीच्या हंगामात चक्क एक रान गव्याचेन दर्शन नागरिकांना झाले आणि एकाच धावपळ उडाली. पुण्यासारख्या शहरात गव्याचे दर्शन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. वनक्षेत्रातून वाट चुकलेला गवा महात्मा सोसायटील आला होता. दरम्यान, वनविभागामार्फत अथक प्रयत्न करून गव्याला ट्रॅन्क्युलाईज करुन पकडण्यात आले मात्र, उपचारादरम्यान या रानगव्याचा मृत्यू झाल्याचा समजल्यानंतर नागरिकांमध्ये हळहळ...
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
पुणे-विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने भाजपचा पराभव झाला. राज्याच्या पुढील विधानसभा निवडणूकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपच्या 50 पेक्षा जास्त जागा जिंकून येऊ शकत नाहित, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार्‍या...