का झाली बाॅलीवूड स्टार भूमी पेडणेकर वाव स्किनकेअर लाईनची ब्रँड अँबॅसिडर?


पुणे-मेक-इन-इंडिया स्किनकेअर आणि वेलनेस ब्रँड वाव स्किन सायन्स तर्फे आज एक लघु ब्रँड व्हिडिओ-फिल्म प्रदर्शित करण्यात आली. या व्हिडिओ फिल्ममध्ये भूमी पेडणेकर असून तिने नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेचा विश्वास कसा संपादन केला याचे रहस्य या फिल्ममध्ये सांगितले आहे. निसर्ग प्रेरित सौंदर्य हे वाव स्किन सायन्सचे वैचारिक अधिष्ठान आहे. भूमी पेडणेकर ही सुद्धा या मूल्य संस्थेशी सहमत असल्यामुळे तिला ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  

आपल्या त्वचेचं निसर्गाशी असलेले एकेकाळचे नाते आपण आपल्या व्यग्र दिनक्रमामुळे विसरून गेलो आहोत हे या फिल्ममध्ये ब्रँडने दाखविले आहे. आपण जसे आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांबरोबर नाते जोपासतो तेवढेच महत्त्व आपल्या त्वचेच्या आणि निसर्गातील नात्याला दिले गेले पाहिजे. आपल्या अवतीभोवती  प्रचंड मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्ती आहे. आपण फक्त त्याला पुनर्जिवित करून ते नाते पुन्हा सजीव करण्याची गरज आहे.

अधिक वाचा  बांधकाम व्यवसायिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे या - पोलीस आयुक्त

बॉलीवूड स्टार आणि क्लायमेट वॉरियर भूमी पेडणेकर म्हणाली, माझा विश्वास फक्त निसर्गावर आहे आणि माझ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त निसर्गावरच मी विश्वास ठेवू शकते. त्यामुळेच वाव स्किन सायन्सला माझी पसंती आहे. क्लायमेट वाॅरियर बनल्यापासून मी पुन्हा निसर्गाच्या जवळ गेली आहे. मी आतापर्यंत काय गमावले याची जाणीव मला निसर्गाजवळ गेल्यामुळे झाली आहे. आपल्या आहाराच्या सवयींपासून ते त्वचेच्या निगराणीपर्यंत सर्वच गोष्टींसाठी आणि निसर्गाच्या जवळ गेलो पाहिजे. तुमच्यापर्यंत नैसर्गिक उत्पादने आणून वाव स्किन सायन्स हे काम करत आहे. त्यामुळे मी विश्वासाने म्हणू शकते की वाव ब्रँडवर विश्वास म्हणजे निसर्गावर विश्वास.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love