gtag('js', new Date());
पुणे--कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हर्षवर्धन रायभान जाधव...
पुणे--दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची उपेक्षा थांबवून केंद्र सरकारने पुढील तीन दिवसात शेतकरी विरोधी असलेले तिन्ही कायदे रद्द केले नाही,तर भारतीय किसान सभा महाराष्ट्रातही हे आंदोलन आणखी तीव्र करेन, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा संयम कसा सुटेल याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे असा आरोप करीत काहीही झाले...
पुणे   केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी युवा कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि  शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
पुणे- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत , असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. भाजपातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  
आधुनिक वाल्मिकी अर्थात ग. दि. माडगूळकर यांचा आज (ता. १४ डिसेंबर) हा पुण्यस्मरण दिन त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन...रामायणातील कथांचा आणि त्यातील आदर्शवत समाज जीवनाची संमोहित करणारी वाटचाल सर्व विश्वाला प्रेरित करत होती. सुमारे ६५ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक एक एप्रिल १९५५ रामनवमीला पुणे आकाशवाणीवरून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी एक अजोड रामकथा म्हणजे...
पुणे-महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या वतीने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मागील 5 - 6 महिन्या पासून अनेकदा मा. मुख्यमंत्री, उर्जामंत्री, यांच्याकडे पत्र पाठूवन आंदोलने, पाठपुरावा केला या असंख्य पत्रव्यवहारा नंतर देखील कामगारांच्या समस्यांकडे मा. मुख्यमंत्री व मा. उर्जामंत्री यांनी आजवर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना सध्या वीज उद्योगातील कामगारांची झाली आहे त्यामुळे...