अभिनेते मोहन जोशी आणि कवयित्री डॉ.अरूणा ढेरे यांना यंदाचा वाग्यज्ञ साहित्य – कला गौरव पुरस्कार जाहीर

कला-संस्कृती
Spread the love

पुणेः- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 25 आणि 26 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यंदाचा वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी  आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ.अरूणा ढेरे यांना जाहीर झाला आहे.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी ही माहिती दिली.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे हे संमेलन होणार आहे.या संमेलनात शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी, दुपारी 4.00 (चार) वाजता, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. रोख रूपये 11,000 (अकरा हजार) आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर, कवी ग्रेस, यशवंत देव, सुलोचना चव्हाण, श्रीनिवास खळे, डॉ.गिरीश ओक, जगदीश खेबुडकर, सयाजी शिंदे, डॉ.अच्युत गोडबोले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी साहित्यिक कलावंत संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या दोन व्यक्तींना स्व. रमेश गरवारे स्मरणार्थ वाग्यज्ञ साहित्य-कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा मराठी आणि हिंदी सिने-नाट्य सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मोहन जोशी यांनी 250 मराठी चित्रपट, 350 हिंदी चित्रपट, 50 मालिका आणि 48 नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तर ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका आणि 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. अरूणा ढेरे यांनी कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित आणि बालसाहुित्यात विपूल लेखन केले आहे. त्यांची जवळपास 40 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *