नवले ब्रीजवर भीषण अपघात :ट्रकची सात ते आठ वाहनांना जोरदार धडक

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे— पुणे-बंगळुरु महामार्गावर नवले ब्रीजवर भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र, काही वाहनांचा चुराडा झाला तर सातजण लखमी झाले. अलीकडच्या काळात नवले ब्रिजवर अशा प्रकारचा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. नवले ब्रिजजवळ वाहतुकीच्या रहदारीमुळे अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. काहीवेळा काही चूक नसताना काहींना हकनाक आपले प्राण गमवावे लागले आहे.

चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रक साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं. यावेळी समोर असणाऱ्या तसंच तिथे रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकने धडक दिली. अपघातामुळे काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळासाठी तिथे वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. दरम्यान अपघातात सहा ते सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *