gtag('js', new Date());
पुणे- आपल्यासमोर असलेल्या सर्व आव्हानांवर मात करत एमएचटी-सीईटी परीक्षेत तब्बल 96.52 टक्के गुण मिळविणाऱ्या यश गालपेल्ली या विद्यार्थ्याचा सह्याद्री हॉस्पिटल्स तर्फे सत्कार करण्यात आला. 2018 मध्ये विल्सन डिसीज या गंभीर आजाराचे निदान झाल्यावर त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड मध्ये जिवंत दात्याकडून यकृत मिळून प्रत्यारोपण झालेला यश हा पहिला लहान वयातील रुग्ण...
पुणे--राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाइन निकाल बुधवारी (दि.२३) दुपारी १ वाजता जाहीर झाला. दहावीचा एकूण निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा एकूण निकाल १८.४१ टक्के लागला आहे. कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर जुलै-ऑगस्टमध्ये होणारी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती.राज्यातील पुणे, नागपूर,...
पुणे---औरंगाबाद व पुणे विभागात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, बाजरी, या पिकांचे आणि पालेभाज्या, फळे यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. याचबरोबर रस्ते, वीज, घरे, यांसारख्या पायाभूत सुविधांवर परिणाम झालेला निदर्शनास आला आहे. झालेल्या नुकसानापोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन आतंर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश कुमार यांनी दिले.
पुणे- एक जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथे हजारो लोक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ डिसेंबर रोजी पुन्हा एल्गार परिषद भरविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. निवृत्त न्यायमूर्ती  बी. जी. कोळसे पाटील यांनी ही परिषद भरवण्यासाठी  पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यात परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे.निवृत्त न्यायमूर्ती बी....
पुणे-  नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या...
पुणे— महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार मागे घेण्यासाठी महामंडळाच्या रिजनल ऑफिसरच्या वतीने मनसे पदाधिकाऱ्याने कंपनीच्या अधिकाऱ्याकडे मागणी केलेल्या 20 लाखांच्या खंडणीपैकी  टोकन म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलास नरके (रा. तळेगाव ढमढेरे,...