31 डिसेंबर संध्याकळी 5 ते १ जानेवारी रात्री 12 पर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)—कोरोनाचे संकट आणि १ जानेवारीला शौर्य दिनानिमित्त कोरेगाव- भीमा येथे होणारी भीम अनुयायांची गर्दी या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ डिसेंबर २०२० सांयकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२१ च्या रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद Pune-Nagar highway closed from 5 pm on December 31 to 12 noon on January 1ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

 कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमत्त कोरेगाव-भीमा येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी हजारो भीम अनुयायी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळते. सध्या राज्यात सुरू असलेला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शौर्य दिनाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून त्याचा भीम अनुयायांनाच धोका होऊ शकत असल्याने खबरादारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.  

दरम्यान, कोरेगाव-भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमा येथे आंबेडकरी जनतेची गर्दी उसळून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी बाहेरच्या लोकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे पास आहे, अशा लोकांनाच कोरेगाव-भीमा येथे प्रवेश देण्यात येणार असल्यचा सूत्रांनी सांगितलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *