अपहरण करून मुलीवर बलात्कार


पुणे- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर तीन जणांनी बलात्कार  केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात समोर आली आहे. तिला बळजबरीने गाडीत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येते तिच्यावर बलात्कार करण्यात अल्यचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , २१ डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास ही तरुणी रस्त्याने एकटी जात होती. त्यावेळी तीन आरोपींपैकी सागर दोन साथीदारांसह गाडीतून तिथे आला. त्याने तरुणीला अडवले आणि मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बस. गाडीत बसली नाही, तर मी जिवाचे बरेवाईट करून घेईन, असं म्हणाला.

अधिक वाचा  #Sharad Mohol Murder Case : ऑक्टोबर महिन्यातच झाला होता शरद मोहोळ याला मारण्याच्या प्रयत्न?

त्यानंतर त्याने विषारी द्रव्याची बाटली तरुणीला दाखवली. त्यामुळे घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर तिघांनी तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं व हातपाय बांधून नेवासा (अहमदनगर) परिसरात घेऊन गेले. तिथेच तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा पुण्यामध्ये आणून सोडलं. तरुणीने त्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love