gtag('js', new Date());
पुणे: ब्रिटनहून आलेल्या एक तरुण कोरोना बाधित आढळला आहे; परंतु त्याला ब्रिटनमधील व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का, याची तपासणी केली जाणार असून, दोन दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे. दरम्यान 1 डिसेंबर पासून पुण्यात 542 प्रवासी ब्रिटनहून परतले आहेत. त्यांचा शोध घेउन तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे.ब्रिटनमध्ये कोरोना...
पुणे- भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याची आकडेवारी भाजपकडे असेल. कर्जमाफी योजनाही तीन वर्ष चालली हे प्रथमच महाराष्ट्रातील जनतेला आणि शेतकरीवर्गाला दिसले त्यामुळे फडणवीसांनी महाविकास आघाडीला दोष देण्यापेक्षा स्वत: आकडे वाचावेत आणि आत्मचिंतन करावे अशी टीका क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल...
पुणे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळले पाहिजे अशी घोषणा केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यापेक्षा वरचढ निघाले व त्यांनी बागायतदारांना दीडलाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे सांगितले. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई राज्यसरकारने दिली नसून राजा उदार नाही...
पुणे(प्रतिनिधी)—कोरोनाचे संकट आणि १ जानेवारीला शौर्य दिनानिमित्त कोरेगाव- भीमा येथे होणारी भीम अनुयायांची गर्दी या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ डिसेंबर २०२० सांयकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२१ च्या रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद Pune-Nagar highway closed from 5 pm on December 31 to 12 noon on January 1ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
पुणे- स्व. पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा करण्यात येणार असून राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते – कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सोबत किसान विकास सन्मान मेळाव्यात हा दिवस साजरा करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांनी गुरुवारी दिली.पुणे येथे...
पुणे- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर तीन जणांनी बलात्कार  केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात समोर आली आहे. तिला बळजबरीने गाडीत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येते तिच्यावर बलात्कार करण्यात अल्यचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल...