gtag('js', new Date());
पुणे-- गेल्या ३३ दिवसांपासून बेपता असलेले पुण्यातील प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले असून पाषाणकर यांना राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी   मंगळवारी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर...
पुणे – पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडी, भाजप आणि मनसेच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याची तक्रार पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.पुणे पदवीधर मतदार संघातील प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील यांच्यात खरी लढत होणार...
पुणे—भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अभ्यास नसलेले छोटे नेते अशा शब्दांत टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द पेटले आहे. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा...
पुणे-- ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकत  सर्वसामान्य ग्राहकांना विज वितरण कंपनीने विजेचा शॉक दिला असून भूलथापा देणार्‍या सरकारने जनतेची माफी मागावी व दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावे आणि वारंवार शब्द फिरून लोकांची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. वाढीव...
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
पुणे (प्रतिनिधी) :-पुणे पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आदर्श उमेदवार असून त्यांच्या घराण्याची देशसेवेची परंपरा आहे. प्रश्न धसाला लावण्याची वृत्ती असलेले लाड विचारांशी तडजोड न करता प्रश्न सोडवतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात परिवर्तन होईल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
पुणे -यशवंतराव स्मृती दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यावर्षी अभिनेते मोहन जोशी व त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला आहे. बुधवार २५ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ५:३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे देण्यात येणार आहे अशी माहिती कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी...