भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी साई संस्थानने ड्रेसकोड बद्दल लावलेल्या वादग्रस्त बोर्डला फासले काळे

महाराष्ट्र
Spread the love

शिर्डी–शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून भक्तांनी भारतीय वेशभूषेत यावे असे बोर्ड लावून त्याची सक्ती करण्यात आली होती ,अशा पद्धतीचा बोर्ड लावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे असा आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्याला विरोध केला होता.

दरम्यान, साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी मार्गाने संस्थानने बोर्ड काढून टाकावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. संस्थानच्या वतीने तृप्ती देसाई किंवा भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन बोर्ड काढू नये  म्हणून घाबरून सदर बोर्ड उंचावर लावण्यात आले होते. हे बोर्ड काढण्याची विनंती करूनही  31 डिसेंबरपर्यंत ते बोर्ड काढण्यात आले नाहीत, म्हणून आज दिनांक 7 जानेवारी 20 21 रोजी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी ५:१५ च्या दरम्यान या बोर्डला जाऊन काळे फासले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भक्तांची बरीच गर्दी असल्यामुळे पहिल्या आठवड्यात तृप्ती देसाईंनी भक्तांना कोणताही आंदोलनामुळे त्रास नको म्हणून आंदोलनाची पुढची दिशा किंवा तारीख जाहीर केली नव्हती.परंतु आज भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी या बोर्डला जाऊन काळे फासले आहे.भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी आणि साईबाबांचे भक्त असलेल्या हर्षल पाटील, मनिषा कुंजीर ,मीनाक्षी शिंदे यांनी आज बोर्डाला काळे फासले .

अन्यथा शिर्डीत येऊन बोर्ड काढू – तृप्ती देसाई

संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. शिर्डी संस्थानवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होतीआणि तो बोर्ड काढण्यासाठी आम्ही शिर्डीला निघालो होतो. परंतु कायडा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी आम्हाला पुन्हा पाठवले होते. त्यामुळे साईबाबांनी जी शिकवण दिली होती त्याप्रमाणे हे बोर्ड काढून टाकावेत अशी विनंती आम्ही संस्थानला केली होती. मात्र, आम्ही ते बोर्ड काढू नये म्हणून ते बोर्ड अधिअक उंचावर लावण्यात आले. कढण्यात आले नाही. म्हणून, आज भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीत जाऊन या वादग्रस्त बोर्डाला काळे फासले. संस्थानच्या विरुध्द कोणी आवाज उठवत नव्हतं , परंतु आता भूमाता ब्रिगेड आकारामक झाली आहे. कारण काकड आरतीला पैसे घेण्याकॅहा विषय असो, भक्तांना अध्यात्मिक शिक्षण दिलेले प्रशिक्षण असो किंवा ड्रेसकोडचा वाद असो भूमाता ब्रिगेड आता शिर्डी संस्थानच्या दादागिरीच्या विरोधात काम करणार आहे. आतातरी संस्थानने हे बोर्ड काढावेत अन्यथा आम्ही शिर्डीत येऊन हे बोर्ड काढू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *