भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्यात राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चार काळविटांचा मृत्यू


पुणे—पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या तुटलेल्या भिंतीतून आतमध्ये शिरकाव करून भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्यात संग्रहालयातील चार काळविटांचा मृत्यू Death of four antelopesझाला आहे. दरम्यान, या कुत्र्यांना पकडण्यात यश आले आहे.

मृतांमध्ये दोन नर तर दोन मादी काळविटांचा समावेश आहे. तर अन्य एक काळवीट जखमी झालं आहे. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात ३४ काळवीट होते, त्यातील चार काळवीटांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने आता काळवीटांची संख्या फक्त ३० राहिली आहे. प्राणीसंग्रहालयात सकाळी कर्मचारी फिरत असताना त्यांना चार काळवीट मेलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर आजुबाजूला शोध घेतल्यावर कुत्री असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी लगेच त्या कुत्र्यांना पकडले. पाच पैकी चार कुत्र्यांना पकडण्यात यश आले. पण एक कुत्रा इतरत्र पळून गेला.

अधिक वाचा  वज्रनिर्धार मोफत लसीकरण महाअभियानास प्रारंभ

 प्राणीसंग्रहालयाच्या तुटलेल्या भिंतीतून भटक्या कुत्र्यांनी शिरकाव केल्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. प्राणीसंग्रहालयात शिरकाव केल्यानंतर कुत्र्यांनी काळवीटांवर हल्ला केला. बिबट्याच्या खंदकाशेजारी काळवीटांचे खंदक आहे. त्या खंदकापलीकडे कात्रज तलाव आहे. गेल्या वर्षी (२५ सप्टेंबर २०१९) खूप पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तेव्हा पाण्याला वाट करून देण्यासाठी प्राणीसंग्रहालयाची भिंत तोडली होती. ती भिंत पुर्णपणे बांधली गेली नाही. म्हणून त्या भिंतीमधूनच ही कुत्री आत आली असतील, असा अंदाज आहे.

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात घुसून केलेल्या हल्ल्यात चार काळवीटांचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक कुत्र्यांनी हल्ला केल्याने, काळवीट सैरभर धाऊ लागले. यामध्ये एकमेकांची धडक झाली. त्यामुळे त्यांचं हृदय बंद पडलं व चौघांचा मृत्यू झाला आहे, असे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा सुर्यवंशी पाटील  यांनी संगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love