gtag('js', new Date());
पुणे—पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या तुटलेल्या भिंतीतून आतमध्ये शिरकाव करून भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्यात संग्रहालयातील चार काळविटांचा मृत्यू Death of four antelopesझाला आहे. दरम्यान, या कुत्र्यांना पकडण्यात यश आले आहे.मृतांमध्ये दोन नर तर दोन मादी काळविटांचा समावेश आहे. तर अन्य एक काळवीट जखमी झालं आहे. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात ३४ काळवीट...
निलम गोऱ्हे यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा
पुणे--आम्ही नाटक कंपनी म्हणून काम करत असलो तरी, देवेंद्र फडणवीस प्रेक्षक म्हणून चांगले काम करतायेत, त्यांनी असंच काम करत राहावं, आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही,अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.  मी परत येईन या वाक्याने फडणवीस यांना चांगलाच धक्का बसला असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या...
पुणे--महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापे घालत देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. हिमाचल प्रदेशातील वेगवेगळय़ा जिल्हय़ांमध्ये ही कारवाई केली गेली आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेतले असून, मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ड्रग्ज पेडलरवर कारवाई करून कोटय़वधी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले होते. त्याअनुषंगाने ही...
पुणे- मागील दहा महिन्यापासून देशभरात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लस नेमकी केव्हा बाजारात येइल आणि आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट कोवीशील्ड’ ही लस लवकरच बाजारात सर्वसामान्यांकरिता उपलब्ध होईल अशी अपेक्षा असताना, सिरमने लसीकरिता वापरलेल्या ‘कोवीशील्ड’ नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. नांदेड...
पुणे—भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी पुण्यातील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसे यांचे वकीलपत्र आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास करण्यासाठी...
पुणे(प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला  काल रात्री भाजप नेते आणि माजी मंत्री  गिरीश महाजन यांनी  डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळामध्ये वाद...