gtag('js', new Date());
पुणे- साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यामान कार्यकारी मंडळाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षे मुदतवाढ देण्यावरून परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा वादंग झाला. एखाद्या सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा असावी अशा वातावरणात अखेर विरोधकांचा विरोध डावलून विद्यमान कार्यकारी मंडळाला निवडणूक न घेता 5 वर्षे मुदत वाढ देण्याचा निर्णय आवाजी मतदानाने घेण्यात आला.
पुणे--महात्मा गांधी यांचा मोहनदास करमचंद गांधीपासून सुरू झालेला प्रवास हा महात्मा पर्यंत पोचला. या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट जावणते की महात्मा हा उशिरा जन्माला आलेला आहे. हा संपूर्ण प्रवास जाणिवांचा, विचारांचा, अनुभवांचा प्रवास आहे. आजच्या वातावरणात देशात परदेशात कुठेही गांधींच्या अहिंसेच्या विचारांची दखल ही शांतता देऊन जाते. त्यामुळे महात्मा गांधींचे विचार हा चमत्कार नव्हे तर तो...
पुणे- पती जाणे आणि विधवा होने हा काही स्रीचा दोष नाही.परंतू, विधवा महीलेला समाजाने दिलेली ही भयंकर शिक्षा आहे.ती शिक्षा भोगतांना विधवा स्रियांना जो काय मनस्ताप होतो त्रास होतो त्याची कल्पना करवत नाही. पती नसेल तर त्या महीलेने घरातील सर्व कामे करणे, जेवन बनवने, देवपुजा, नोकरी, मुलांचे पालन पोषण, सासू सासरे यांची जबाबदारी, ईतर जबाबदारी, हे...
पुणे -नेहमीचा अर्थसंकल्पात छोट्या उद्योगांच्या तोंडाला पाने पुसली जातात 2021 चा अर्थसंकल्प स्थानिक उद्योगांना विचारात घेऊनच करावा लागेल अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आणि देशातील उद्योग मोठ्या प्रमाणात परराज्यात आणि परदेशात स्थलांतरीत होईल अशी भीती फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केली आहे. जीएसटी, नोटाबंदी आणि नंतर कोरोनाचे संकट आल्यामुळेच उद्योग क्षेत्रावर...
पुणेः- मनुष्याचे बाह्य आणि अंतर असे दोन विश्व असतात. यात कधी संवाद तर कधी संघर्ष असतो. कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो तर, जगण्यातले दुःख, आनंद आणि संघर्ष या तीन त्रिज्यांमधून आलेल्या आतल्या आवाजाचा कधी संघर्ष शब्दबद्ध करतो, तर कधी त्याच्याशी संवाद साधतो. बाह्य आणि अंतरविश्वातील संघर्षाचा हुंकार म्हणजे कविता. अनुभवाची कलासक्त अभिव्यक्ती म्हणजे कविता होय,...
पुणे-- प्रबोधनकारांची ओळख बहुआयामी व्यक्ती अशी आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी किती हालअपेष्टा सोसल्या हे त्यांचे साहित्य वाचल्यानंतर समजते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रबोधनकारांच्या विचारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या साहित्य आणि विचारात बंडखोरी दिसते. त्यांची ठाकरी शैली 100 वर्षे झाली तरी अजूनही टिकून आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. प्रबोधनकार यांच्या विचारांचा जागर होण्यासाठी...