नाहीतर तुमचा मामा होईल, कोणाला आणि का म्हणाले अजित पवार असे?


अहमदनगर- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीतून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपशी घरोबा केलेल्या पिचड पिता- पुत्रांचा समाचार घेतला तर आपल्या विनोदी शैलीत प्राजक्त तणपुरे यांना विकास कामांचा पाठपुरावा करण्याबाबत सूचना केल्या.

अकोले येथील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच नाव न घेता त्यांनी समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘नगर आणि पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. पुण्याचे दहा तर नगरने सात आमदार दिले. अकोल्यात ऐनवेळी पवार साहेबांना सोडून गेलेले पडले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा असा चिमटा त्यांनी काढला. राष्ट्रवादीला सोडलेल्यांची अशीच अवस्था होते. नगर जिल्ह्यात निवडून आलेले बहुतांश आमदार तरुण आहेत. त्यातच राहुरीचे आमदार तनपुरे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. मी जेव्हा नवीन राज्यमंत्री झालो, त्यावेळी माPयाकडे तीनच खाती होती. आता तनपुरे यांच्याकडे किती तरी जास्त खाती आहेत. त्याचा उपयोग त्यांनी पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघात जास्तीत जास्त करावा. नगर जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले आहे. आता त्यांचे हित जोपासणे आमची जबाबदारी आहे,’ असे म्हणत निळवंडे धरण्याच्या  कालव्याच्या कामांसाठी मामांच्या(जलसंपदा मंत्री जयंत पाटील) मागे लागा, नाहीतर तुमचं मामा होईल’ आशा सूचना त्यांनी प्राजक्त तणपुरे यांना केल्या. जयंत पाटील हे प्राजक्त तणपुरे यांचे नात्याने मामा आहेत.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  तर.. नरेंद्र मोदी काय चीज आहे?- शरद पवार